ETV Bharat / state

पुण्यात सख्ख्या काकानेच पॉर्न फिल्म बघून 'त्या' चिमुकलीवर केला अत्याचार - पुणे

पिंपरी-चिंचवड येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. अखेर त्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:47 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये सख्ख्या काकानेच अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याचे समोर आले आहे. त्याने घटनेपूर्वी २-३ तास पॉर्न फिल्म बघितली होती. त्यानंतर त्याने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. आता सांगवी पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यात सख्ख्या काकानेच पॉर्न फिल्म बघून 'त्या' चिमुकलीवर केला अत्याचार

नातेवाईक नराधमाने घटनेच्या दिवशी दोन ते तीन तास पॉर्न फिल्म बघितली होती. त्यानंतर शेजारच्या घरात आई-वडिलांसह झोपलेल्या चिमुरडीला गुपचूप उचलून घराच्या पाठीमागे नेले. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ती ओरडत असल्याने तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली नराधम नातेवाईकाने दिली आहे.

तो चिमुकलीच्या शोधकार्यात देखील सहभागी झाला होता. घटना घडल्यानंतर संबंधित घटनास्थळावरून ६ जणांना चौकशीसाठी पोलीस ताब्यात घेतले होते. त्यापैकी हा तिचा नातेवाईक होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळीच पोलिसांचा संशय बळावला. घटनेच्या दिवशी त्याने मोबाईलवर काय केले? किती वाजेपर्यंत मोबाईल सुरू होता? या तांत्रिक बाबी तपासून पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यानंतर त्याने नातेवाईक चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. तसेच विविध क्षेत्रातून तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान, आरोपीला बेड्या ठोकल्या असून घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

घटना कशी आली उघडकीस?
अडीच वर्षीय चिमुकलीचे सोमवारी राहत्या घरातून अपहरण झाल्याचे समोर आले. रात्री दीडच्या सुमारास आई जागी झाल्याने घटना उघडकीस आली होती. दोन तासांच्या शोधकार्यानंतर त्यांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक आणि आई-वडील यांच्यासोबत आरोपी नातेवाईक हा देखील चिमुकलीला शोधत होता. मंगळवारी सकाळी पाऊणेआठच्या सुमारास घराच्या पाठीमागे पीडित चिमुकलीचा मृतदेह आढळला. तिचे औंध रुग्णालयात तातडीने शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये त्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घटनस्थळावरून संशयीत ६ जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी, नातेवाईक नराधम हा आरोपी निघाला त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Intro:mh_pun_02_arrest_avb_10002Body:mh_pun_02_arrest_avb_10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना शहरात दोन दिवसांपूर्वी घडली होती. घटनेत चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम हा नातेवाईक असल्याचे समोर आले असून त्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेच्या दिवशी नातेवाईक नराधमाने दोन ते तीन तास पॉर्न फिल्म बघितली होती त्यानंतर शेजारच्या घरात आई वडिलांसह झोपलेल्या चिमुरडीला गुपचूप उचलून घराच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तो ओरडत असल्याने तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली नराधम नातेवाईकाने दिली आहे. दरम्यान, तो चिमुकलीच्या शोधकार्यात देखील सहभागी झाला होता. घटना घडल्यानंतर संबंधित घटनास्थळावरून सहा जणांना चौकशीसाठी पोलीस ताब्यात घेतले होते. पैकी हा तिचा नातेवाईक होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. घटनेच्या दिवशी त्याने मोबाईलवर काय केले आणि किती वाजे पर्यंत मोबाईल सुरू होता या तांत्रिक बाबी तपासून पोलिसी खाक्या दाखवल्या. तेव्हा त्याने अडीच वर्षीय नातेवाईक चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त झाली होती, तसेच विविध क्षेत्रातून तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान, आरोपीला बेड्या ठोकल्या असून घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.

घटनाक्रम

सोमवारी पीडित मयत अडीच वर्षीय चिमुकलीचे राहत्या घरातून अपहरण झाल्याचे समोर आले. रात्री दीड च्या सुमारास आई जागी झाल्याने घटना उघडकीस आली होती. दोन तासांच्या शोधकार्यानंतर त्यांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक आणि आई वडील यांच्या सोबत आरोपी नातेवाईक हा देखील चिमुकलीला शोधत होता. मंगळवारी सकाळी पाऊने आठ च्या सुमारास पीडित चिमुकलीचा घराच्या पाठीमागे मृतदेह आढळला. तिचे औंध रुग्णालयात तातडी शवविच्छेदन करण्यात आले त्यात अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घटनस्थळावरून संशयित सहा जणांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले. पैकी, नातेवाईक नराधम हा आरोपी निघाला त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बाईट:- प्रभाकर शिंदे- वरिष्ठ पोलीस निरीक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.