ETV Bharat / state

रांजणगाव एमआयडीसीत ब्रिटानिया कंपनीत नोकरी भरती; सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा - पुणे लॉकडाऊन न्यूज

रांजणगाव एमआयडीसीमधील कंपन्या लॉकडाऊनच्या काळापासून बंद करण्यात आल्या आहे. मात्र, येथील बिस्किट बनविणारी ब्रिटानिया कंपनीने कामगार भरती सुरू केली आहे.

Recruitment in Britannia Company
रांजणगाव एमआयडीसीत ब्रिटानिया कंपनीत नोकरी भरती;
author img

By

Published : Apr 13, 2020, 2:17 PM IST

Updated : Apr 13, 2020, 3:10 PM IST

पुणे - देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकांनी गर्दीची ठिकाणे टाळावी, यासाठी कलम 144 अंतर्गत राज्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. प्रशासन यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे,मात्र दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये ब्रिटानीया कंपनीने लॉकडाऊन काळात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करत भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

रांजणगाव एमआयडीसीत ब्रिटानिया कंपनीत नोकरी भरती; सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा
रांजणगाव एमआयडीसीमधील कंपन्या लॉकडाऊनच्या काळापासून बंद करण्यात आल्या आहे. मात्र, येथील बिस्किट बनविणारी ब्रिटानिया कंपनीने कामगार भरती सुरू केली आहे. कंपनीच्या गेटबाहेर मोठ्या प्रमाणात तरूण तरूणींनी गर्दी केली असून या ठिकाणी कुठेही सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नाही.कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन दिवस-रात्र मेहनत करून काम करत आहे. मात्र, कंपन्यांकडून जर नियम धाब्यावर बसून अशा प्रकारचे काम सुरू असेल तर पुढील काळात कोरोनाचा संसर्ग एमआयडीसी परिसरात वाढण्याची भिती आहे. दरम्यान, कंपनीने सुरू केलेली नोकर भरती चुकीची असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Last Updated : Apr 13, 2020, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.