ETV Bharat / state

सुप्यात चिंचेची विक्रमी आवक.. बाजारभावात ४०० रुपयांची घसरण - सुप्यात चिंचेची विक्रमी आवक

बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारामध्ये चिंचेच्या १० हजार ३४१ पोत्यांची मोठी आवक झाल्याने बाजारभावात ४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेल्या चिंचेला योग्य बाजार न मिळाल्याने काहींनी चिंच अंसुड केली.

Record inflows of tamarind
Record inflows of tamarind
author img

By

Published : Mar 29, 2021, 8:33 PM IST

बारामती - बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारामध्ये चिंचेच्या १० हजार ३४१ पोत्यांची मोठी आवक झाल्याने बाजारभावात ४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेल्या चिंचेला योग्य बाजार न मिळाल्याने काहींनी चिंच अंसुड केली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजाराकडे जिल्ह्यातील सर्वात मोठी चिंचेची बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. येथील बाजारामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, भोर, फलटण आणि पुरंदर आदी ठिकाणावरून शेतकरी चिंच विक्रीसाठी आणतात. तर चिंच खरेदीसाठी लातूर,बार्शी, तुळजापूर, अहमदनगर व आंध्रप्रदेश मधून खरेदीदार येत असतात अशी माहिती बाजार समितीचे सभापती वसंतराव गावडे यांनी दिली.

चालूवर्षी आज अखेर ४५ हजार ९२९ पोत्यांची आवक -

येथील चिंचेचा बाजार शनिवारचा असतो. मात्र आवक वाढल्याने रविवारी ही चिंचेचे लिलाव सुरु असतात. यावेळी येथील उपबाजारात चिंचेच्या एकूण १० हजार ३४१ पोत्यांची आवक झाली. तर अखंड चिंचेस १६११ ते २६०० व फोडलेल्या चिंचेस ५ हजार ते ७ हजार १०० रुपये बाजार भाव मिळाला. तसेच चिंचोक्यास १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल बाजार मिळाल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने एकूण चोवीस हजार पोत्यांची आवक झाली होती. चालूवर्षी आज अखेर ४५ हजार ९२९ पोत्यांची आवक झाल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. येथील चिंच लिलाव दर शनिवारी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चिंच विक्रीसाठी आणावी. तसेच चिंचेचे लिलाव मे अखेर पर्यंत चालतील अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय सणस यांनी दिली.येथील मागिल आठवड्यात चिंचेची मोठी आवक झाल्याने बाजार भावात घसरण झाली. तसेच वर्षे अखेर व महिना अखेरच्या सुट्टया आल्याने बाजारभावावर परिणाम झाल्याची माहिती येथील आडत व्यापारी सुभाष चांदगुडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.