ETV Bharat / state

मिलिटरीच्या भरतीप्रमाणे भाजपमध्येही पक्ष वाढीसाठी भरती करावी लागते - दानवे - ७५ वर्षे

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बाहेरच्या चांगल्या माणसांना घ्यावेच लागतात. मिलिटरीच्या भरतीप्रमाणे भाजपमध्येही पक्ष वाढीसाठी भरती करावे लागते, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप सदस्य अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त दानवे पुण्यात आले असता बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:10 PM IST

पुणे - भाजपने 2019 च्या लोकसभेच्या निवडणूकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता 2014 च्या निवडणूकीची तयार सुरु आहे. कुठलाही पक्ष सत्तेत आला की संघटनेकडे दुर्लक्ष करतो. मात्र आम्ही तस होऊ न देता पक्ष वाढीसाठी काम करत आहोत, असे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीची जोरात तयारी सुरू असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप सदस्य अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त दानवे पुण्यात आले असता बोलत होते. आमचे १५ ऑक्टोबर पर्यतच नियोजन झाले असून 'शिवशाही परत' असा नारा त्यांनी दिला आहे. सेना आणि आमच्यात ठरले आहे. जे ठरले ते आमच्यातच ठरले, बाकीच्यांना सांगण्यासाठी नाही असे म्हणून दानवेंनी युतीच्या प्रश्नाला पूर्णविराम लावला. तसेच विधानसभेत भाजप - सेनेच्या २२० जागा निवडून येणार असल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बाहेरच्या चांगल्या माणसांना घ्यावेच लागतात. मिलिटरीच्या भरतीप्रमाणे भाजपमध्येही पक्ष वाढीसाठी भरती करावे लागते, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये ७५ वर्षे वयोमर्यादा आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणुका लढणे नाकारले होते. आता पुढच्या वेळेस गिरीश बापट यांचा नंबर असेल. त्यामुळे तेही निवडणूक लढणार नाहीत, असा टोला त्यांनी बापट यांच्यासमोरच लगावला. दरम्यान दानवे यांनी पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लोकसभेला दानवे पराभूत होतील असे आपल्या सर्व्हेतुन समोर आले असल्याचे निवडणुकीवेळी सांगितले होते. त्याबाबत विचारले असता त्यांनी काकडे यांची खिल्ली उडवली. काही लोकांना बोलल्याशिवाय करमत नाही पण माझ्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट मी साडे तीन लाख मतांनी निवडून आलो. ते सहयोगी सदस्य आहेत त्यांना सर्व्हे करण्याचा आणि वक्तव्य करण्याच्या अधिकार आहे. भाजपच्या सदस्याला मात्र बंधनं आहेत. भाजपकडे असे पंचवीस सहयोगी सदस्य आहेत, अशा शब्दात त्यांनी आपण काकडेना फारसे महत्व देत नसल्याचे स्पष्ट केले.

Intro:mh pun 01 ravsaheb danve press avb 7201348Body:mh pun 01 ravsaheb danve press avb 7201348

anchor
२०१९ ची निवडणुक संपल्यानंतर भाजपने २०२४ च्या निवडणूकीची तयारी सुरू केलीय मात्र बाकी पक्ष २०१९ ची तयारी करतायत.कुठलाही पक्ष सत्तेत आला की संघटनेकडे दुर्लक्ष करतो पण आम्ही तस न होऊ देता पक्ष वाढीसाठी काम करत आहोत असे सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणूकी जोरात तयारी सुरू असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. आमचे १५ ऑक्टोबर पर्यतच नियोजन झाले असून शिवशाही परत असा नारा त्यांनी दिला आहे..सेना आणि आमच्यात ठरले आहे ते आमच्यातच ठरले बाकीच्यांना सांगण्यासाठी नाही असा टोला त्यांनी लगावला, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजप सदस्य अभियान सुरू करण्यात आले आहे त्यासाठी दानवे पुण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. विधानसभेत भाजप सेनेच्या २२० जागा निवडून येणार आहेत.पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बाहेरच्याना पायघड्या असल्याचे ते म्हणाले. मिलिटरीची भरतीसारखी भाजपमध्ये पक्ष वाढीसाठी भरती करत राहावे लागते. निवडणूक लढवण्यासाठी भाजप मध्ये ७५ वर्षी वयोमर्यादा
केलीय त्यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणुका लढणे नाकारले.पुढच्या वेळेस गिरीश बापट याचा नंबर असेल...तेही निवडणूक लढणार नाहीत असा टोला त्यांनी पुण्याचे खासदार बापट यांना लगावला यावेळी गिरीश बापट त्यांच्या शेजारी बसले होते त्यामुळे एकच हशा उडाला, दरम्यान दानवे यांनी पुण्यातील भाजप चे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी दानवे खासदारकीला पराभूत होतील हे आपल्या सर्व्हे तुन समोर आले असल्याचे निवडणुकीवेळी सांगितले होते त्याबाबत विचारले असता काकडे यांची खिल्ली उडवली रावसाहेब काही लोकांना बोलल्याशिवाय करमत नाही पण् माझ्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. मी साडे तीन लाख मतांनी निवडून आलो. ते सहयोगी सदस्य आहेत त्यांना सर्व्हे करण्याचा आणि वक्तव्य करण्याच्या अधिकार आहे, भाजपच्या सदस्याला मात्र बंधनं आहेत. भाजपकडे असे पंचवीस सहयोगी सदस्य आहेत अशा शब्दात त्यांनी आपण काकडेना फार महत्व देत नसल्याचे स्पष्ट केले…..
Byte - रावसाहेब दानवे,खासदारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.