पुणे : कसबा पोट निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असताना, नाराज इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. तरी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी काँग्रेसमधून बंड पुकारला आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता ही लढत तिरंगी होणार, असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
30 वर्षापासून मी कसबा मतदारसंघात काम करतोय : गेल्या 30 वर्षापासून मी कसबा मतदारसंघात काम करत असून कसबा मतदार संघाची कामे मला माहित आहे. या मतदारसंघात पूर्वी 3 लाख मतदार होते.आत्ता अडीच लाख मतदार राहिले आहे. जे मतदार होते ये इथ कामे न झाल्याने स्थलांतरित झाले आहे. त्या लोकांना इथ परत आणायचं आहे. या मतदारसंघातील वाहतूककोंडी, जुने वाडे तसेच स्थानिक लोकांचे प्रश्न हे महत्त्वाचे असून, ते मी येणाऱ्या काळात सोडवणार आहे, असेदेखील यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले.
अपक्ष उमेदवारांकडूनदेखील उमेदवारी अर्ज : कसबा पोटनिवडणुकीत भाजप तसेच महाविकास आघाडीकडून जरी उमेदवारांनी उमेदवारी भरली असली तरी विविध पक्ष तसेच संघटनांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात तसेच अपक्ष उमेदवारांकडूनदेखील उमेदवारी अर्ज भरण्यात आल आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने हे चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच 3 वेळा नगरसेवक असताना ते एका चौकटीच्या पुढे कधीही गेले नाही. ते ज्या पद्धतीने सांगत आहे की मी एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. तर येथे शहरात राजकीय जीवनात काम करणारा प्रत्येक जण हा गणेश मंडळाचा कार्यकर्ता असतो, अशी टिकादेखील यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
हेही वाचा : Aaditya Thackeray Convoy : औरंगाबादजवळ आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक