ETV Bharat / state

'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'

author img

By

Published : Oct 13, 2019, 6:49 PM IST

महाराष्ट्रात कलम 370 हा निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?,असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला विचारला.

बोलताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद

पुणे - महाराष्ट्रातील लोक देशभक्त नाहीत का? त्यांना जम्मू-काश्मीरची चिंता नाही का? महाराष्ट्र ही शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांची जन्मभूमी आहे. मग या प्रदेशातून 370 विषयी सवाल का उपस्थित होतात? कलम 370 हा निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?, असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला विचारला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

हेही वाचा - ...आता फक्त शेती करून चालणार नाही, शेतीला व्यवसायासह नोकरीची जोड हवी - पवार

रवी शंकर म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर बंदुकीची एकही गोळी चालवावी लागली नाही. देशाचे 106 नियम तिथेही लागू करण्यात आले. हे कलम रद्द केल्याने महिलांना फायदा होणार आहे. यापूर्वी 42 हजार लोक मारले गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. त्यासंदर्भात काँग्रेस का बोलत नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा - 'लालूंना तुरुंगात पाठवणारा अन् राम जन्मभूमीची केस जिंकणारा वकील मीच'

मुंबईवर 2008 मध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हाची सरकार हताश होती. आमच्या सरकारने देशाच्या सीमा मजबूत केल्या आहेत. आताचे सरकार दहशतवादविरोधात सक्त कारवाई करण्यास मागे पुढे पाहत नाही. पहिली गोळी आपण चालवायची नाही, पण पाकिस्तानकडून गोळी आलीच तर तुम्ही गोळ्या मोजायच्या नाहीत, अशा सूचना सैन्यदलाला देऊन ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पंकजा मुंडेंच्या सभेत रिंगरोड बाधित नागरिकांचा गोंधळ, पाच जण ताब्यात

Intro:महाराष्ट्रातील लोकं देशभक्त नाहीत का?, त्यांना जम्मू-काश्मीरची चिंता नाही का? महाराष्ट्र ही शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांची जन्मभूमी आहे. मग या प्रदेशातून 370 विषयी सवाल का उपस्थित होतात? कलम 370 हा निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीला विचारला.पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.. यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते.
Body:रवी शंकर म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर बंदुकीची एकही गोळी चालवावी लागली नाही..देशाचे 106 नियम तिथेही लागू करण्यात आले. हे कलम रद्द केल्याने महिलांना फायदा होणार आहे. यापूर्वी 42 हजार लोक मारले गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, त्यासंदर्भात काँग्रेस का बोलत नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

मुंबईवर 2008 मध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हाची सरकार हताश होती. आमच्या सरकारने देशाच्या सीमा मजबूत केल्या आहेत. आताचे सरकार दहशतवादविरोधात सक्त कारवाई करण्यास मागे पुढे पाहत नाही. "पहिली गोळी आपण चालवायची नाही, पण पाकिस्तानकडून गोळी आलीच तर तुम्ही गोळ्या मोजायच्या नाही" अशा सूचना सैन्यदलाला देऊन ठेवल्याचे त्यांनी सांगितले. Conclusion:महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांना शोधत आहेत. आम्हाला सोडून विदेशात गेल्याची ओरड करीत आहेत. अजून काँग्रेसच्या प्रचाराचा टेकऑफ झाला नसल्याची टीका त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.