ETV Bharat / state

पुण्यात खासगी रुग्णवाहिकासाठी दर निश्चित; जादा भाडे आकारल्यास कारवाई - पुणे लेटेस्ट न्यूज

रुग्णवाहिका मालक जास्त दर आकारत असल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगरला आहे. रुग्णवाहिकासाठीचे दर पुणे आरटीओ कडून निश्चित करण्यात आले आहेत. आरटीओच्या वायूवेग पथक जास्त दर आकारत असलेल्या रुग्णवाहिकांना ताब्यात घेत आहे.

रुग्णवाहिका
रुग्णवाहिका
author img

By

Published : Sep 18, 2020, 12:34 PM IST

पुणे - जिल्ह्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकासाठीचे दर पुणे आरटीओकडून निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी रुग्णवाहिका मालक जास्त दर आकारत असल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगरला आहे.

मोटार वाहन क्रमांक एमएच-12 डीटी-3158 (Maruti Omni Ambulance) तसेच एमएच-14 सीडब्लू 0513 (Traveler Cardiac Ambulance) या रुग्णवाहिकांनी रुग्णांकडून जास्त भाडे घेतल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित वाहन मालकांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले. त्यानुसार आरटीओच्या वायूवेग पथकाने दोन्ही रुग्णवाहिकांना ताब्यात घेतले आहे.

सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढत असल्याने ठरवून दिलेल्या प्रमाणेच दर आकारणी करण्यात यावी, याबद्दल सर्व रुग्णवाहिका चालकांना आदेश देण्यात आले आहेत. रुग्णवाहिकांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्यास तत्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे तक्रार दाखल करावी. या तक्रारीनुसार तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

रुग्णवाहिका प्रकार आणि भाडे -

पहिल्या 25 किलोमीटर अथवा दोन तासासाठी मारुती 500, टाटा सुमो- मॅटेडोर 600, टाटा 407, स्वराज माझदा 900 रुपये याप्रमाणे कमीतकमी आकारणी करता येईल. तसेच पुढचे प्रति किलोमीटरसाठी अनुक्रमे 11 रुपये 12 रुपये आणि 13 रुपये भाडे आकारण्यात यावे. तर प्रति तास प्रतीक्षेसाठी अनुक्रमे 100, 125 आणि 150 रुपये भाडे आकारावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हे दर रुग्णवाहिकेत आतल्या बाजूस लावलेले असावे, असेही सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.