ETV Bharat / state

बारामतीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुणासह त्याच्या आईवरही गुन्हा दाखल - rape on girl in baramati case filed

आरोपीने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) १३ जुलै २०१९ रोजी तिची इच्छा नसताना आपण मित्राच्या घरी जावू असे म्हणत तिला मोटार सायकलवर बसवूले आणि शारदानगर (ता. बारामती) येथून दौंड तालुक्यातील पासलकरवस्ती येथे नेले. त्याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला.

बारामती पोलीस कार्यालय
बारामती पोलीस कार्यालय
author img

By

Published : Mar 6, 2020, 11:52 PM IST

पुणे - बारामतीत महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचे अश्लील छायाचित्रे घेऊन वेळोवेळी तिच्यावर बलात्कारचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ऋषिकेश दत्तात्रय पासलकर (रा. पासलकरवस्ती, दौंड) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी या नराधमाविरोधात तसेच त्याला मदत करणार्‍या युवकाच्या आईच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) १३ जुलै २०१९ रोजी तिची इच्छा नसताना आपण मित्राच्या घरी जावू असे म्हणत तिला मोटार सायकलवर बसवूले आणि शारदानगर (ता. बारामती) येथून दौंड तालुक्यातील पासलकरवस्ती येथे नेले. त्याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्यासोबत अश्लिल छायाचित्रे काढली. तू येत जा, नाही तर तुझी अश्लिल छायाचित्रे तुझ्या घरच्यांना दाखवेन, अशी धमकी तो वारंवार पीडितेला देत होता. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०१९ रोजी त्याने पुन्हा धमकावले. तिला मोटार सायकलवरून पासलकरवस्ती येथील घरी नेले. घरातील बेडरुममध्ये तो तिला घेवून गेला. यावेळी त्याच्या आईने बाहेरून दरवाजाची कडी लावली. त्याने तेथे फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा - अहो आश्चर्यम..! समृद्धी महामार्गात चक्क जमीन गेली चोरीला, शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी

फिर्यादीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या आईने दरवाजा उघडला नाही. या प्रकरणाची वाच्यता केली तर तुझी अश्लील छायाचित्रे सगळीकडे व्हायरल करेन, अशी धमकी देत त्याने तिला बारामती बस स्थानकावर आणून सोडले. छायाचित्रे दाखविण्याची धमकी देत त्याच्याकडून ब्लॅकमेल केले जात असल्याने फिर्यादीने २८ फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्यानंतर ५ मार्च रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. आरोपींविरुद्ध पोलिसांनी बलात्कार, अपहरण तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. तर पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.