ETV Bharat / state

Baba Ramdev : पवार काका-पुतणे महाराष्ट्राच्या राजकारणात शुभ आणि मंगल; रामदेव बाबांची मिश्किल प्रतिक्रिया

अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्या झालेल्या नाट्यावर योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योगगुरू रामदेव बाबा पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान रामदेव बाबा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Ramdev Baba on Maharashtra Politics) (Ramdev Baba on Sharad Pawar) (Ramdev Baba on PM Narendra Modi) (Ramdev Baba on Ajit Pawar)

Baba Ramdev
बाबा रामदेव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 8:03 PM IST

Updated : Aug 28, 2023, 9:06 PM IST

प्रतिक्रिया देताना बाबा रामदेव

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकारणाबाबत बाबा रामदेव यांना प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात शरद पवार, अजित पवार तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा हे चित्र पाहता चांगलंच राजकारण सुरू आहे. राज्यात एक नवीन समीकरण झालं आहे. तसेच देशात देखील असंच काहीसं समीकरण पाहायला मिळत आहे. देशात 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना कुणीच पराभूत करू शकणार नाही. (Ramdev Baba on Maharashtra Politics) (Ramdev Baba on Sharad Pawar) (Ramdev Baba on PM Narendra Modi) (Ramdev Baba on Ajit Pawar)

येणारा काळ हा भारताचा आहे : 'चंद्रयान 3' बाबत बाबा रामदेव म्हणाले की, ज्या दक्षिण ध्रुवावर आजपर्यंत कोणताच देश गेला नव्हता तिथं आपण पोहोचलो आहोत. आपला पराक्रम आता संपूर्ण जगानं पाहिला आहे. ही तर भारताच्या विश्व विजयाची भरारी आहे. देशात सत्तेत असणाऱ्या लोकांची नियती, नेतृत्व आणि नीती यामुळे देश पुढं जातोय. येणारा काळ हा भारताचा आहे. 2047 च्या पूर्वीच आपला देश जगातील आर्थिक आणि अध्यात्मिक महासत्तेचं केंद्र बनेल. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं नेतृत्व आणि मोदींचं नेतृत्व हे भारताला महाशक्ती बनवण्यासाठी मदत करत आहे.

पवार यांचं राजकारण महाराष्ट्रासाठी शुभ : राष्ट्रवादी फुटीबाबत बाबा रामदेव यांना विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांचं राजकारण महाराष्ट्रासाठी शुभ आणि मंगल आहे. देशातील महागाईबाबत बाबा रामदेव यांना विचारलं असता ते म्हणाले की, देशात आव्हानं आहेत आणि संभावना देखील आहेत. त्यांचा सामना करण्यास मोदी सक्षम आहेत. असाच देश पुढं जात असतो.

हेही वाचा -

  1. Baba Ramdev : बाबा रामदेव 2024 मध्ये कोणाला पाठिंबा देणार?, म्हणाले, 'जो पक्ष..'
  2. Patanjali FPO : शेअर गोठविल्यानंतर पतंजली फूड्स आणखी आणणार एफपीओ, बाबा रामदेव यांचा मोठा निर्णय
  3. Baba Ramdev : रामदेव बाबा यांचे खळबळजनक वक्तव्य ; म्हणाले, 'देशातील 90 टक्के राजकारणी..'

Last Updated : Aug 28, 2023, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.