पुणे - यंदाचा अर्थसंकल्प देशाला परिवर्तनाकडे घेऊन जाणार असून, सर्वांना दिलासा देणारा आहे. शेतकऱ्यांनाही अर्थसंकल्पामुळे ताकद मिळणार असून, माझ्या खात्यामध्ये (सामाजीक न्याय) मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला न्याय मिळाला असल्याचे मत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या अर्थसंकल्पावरील टीकेवर बोलताना आठवले म्हणाले, पवार साहेब विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे ते अर्थसंकल्पाच्या विरोधातच बोलणार. पवारांच्या मताशी मी सहमत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी हे बजेट वर्ष आहे ट्वेंटी-ट्वेंटी, अशी छोटीसी कविता म्हणून दाखवली. राज्य सरकारच्या काही मागण्या असेल तर आम्ही मंजूर करू. आमचे सरकार नाही म्हणून राज्यावर अन्याय करण्याची भूमिका नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे मागण्या कराव्यात. त्या मागण्या मी पंतप्रधानांकडे घेऊन जाईल असेही आठवले यावेळी म्हणाले.
एनआरसी संदर्भात नागरिकांचा गैरसमज; मुस्लिम बांधवांना भडकावण्याचा प्रयत्न - आठवले
राज ठाकरे आमच्या मोर्चात आले तर आम्ही त्यांच्या मोर्चात जाऊ. राज ठाकरे यांचे मी अभिनंदन करतो त्यांची भूमिका योग्य आहे. मात्र, शिवसेनेची भूमिका लवचिक झाली आहे. या कायद्याचा समर्थनाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घ्यायला पाहिजे मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्यांच्यावर दबाव आणल्यामुळ त्यांनी ही भूमीका घेतली असल्याचे आठवले म्हणाले.
कोरेगाव भीमा आयोगाच्या अधिकाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार राहिला होता. मागच्या सरकारनंतर आमचेच सरकार येणार होते त्यानंतर हा पगार देण्यात येणार होता. या प्रकरणाचा तपास आता एनआयकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांच्या भूमिकेशी मी सहमत नाही. कोणाला वाचवण्यासाठी नाही तर जे वाचलेत त्यांना अटक करण्यासाठी तपास एनआयकडे सोपवल्याचा आठवले यावेळी म्हणाले.