ETV Bharat / state

दिल्लीतील शेतकरी आंदोलन रेटण्याचा प्रयत्न- रामदास आठवले - ramdas athavle news

कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी नेत्यांसोबत १२ वेळा बैठका घेतलेल्या. पंतप्रधानांनीही शेतकरी बांधवांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, पूर्णपणे कायदा मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी असंविधानिक आहे.

रामदास आठवले
रामदास आठवले
author img

By

Published : Feb 13, 2021, 6:23 PM IST

पुणे- दिल्लीतील शेतकरी आंदोलन रेटण्याचा प्रयत्न होत असून आंदोलन थांबण आवश्यक असल्याचे मत क्रेंदीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंदोलन थांबणे अत्यंत आवश्यक
शेतकरी कायद्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या शेतकरी कायद्याची दीड वर्ष अंमलबजावणी न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेता आले असते. तरी देखील आंदोलन रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान आजारी पडून किंवा हद्यविकाराच्या झटक्याने जवळपास २०० लोकांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी आंदोलनाला केंद्र सराकरकडून सहकार्य
कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकरी नेत्यांसोबत १२ वेळा बैठका घेतलेल्या. पंतप्रधानांनीही शेतकरी बांधवांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, पूर्णपणे कायदा मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी असंविधानिक आहे. या आधी कधीही करण्यात आलेला संपुर्ण कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आली नव्हती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनासाठी क्रेंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्यात आले असल्याचे विधान आठवले यांनी केले आहे.

म्हणून आंदोलकांबरोबर पोलिसांचा संघर्ष

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला केद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. मात्र, ज्या मार्गाने रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली होती त्या मार्गाव्यतरिक्त इतर मार्गांचा वापर शेतकऱ्यांनी केला. त्यामुळेच शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला असल्याचे आठवले म्हणाले. एवढेच नाही तर लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमानही करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. जर केंद्र सराकारने रॅलीसाठी परवानगी दिली नसती तर सरकारविरोधात आणखी रोष निर्माण झाला असता असेही आठवले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.