ETV Bharat / state

आशा सेविकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली असतानाही आंदोलन करणे चुकीचे - आरोग्यमंत्री - आशा सेविकांच्या आंदोलनावर काय म्हणाले आरोग्यमंत्री

आशा सेविकांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्या कामगार युनियन प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा झालेली आहे. या बैठकीनंतर आशा सेविकांचे आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या समस्याबाबत राज्य सरकारने विचार करण्याचे आश्वासन दिलेले असताना देखील आशा सेविका आंदोलन करत असतील तर ते योग्य नाही, असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले.

Rajesh tope on aasha worker agitation
आशा सेविकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली असतानाही आंदोलन करणे चुकीचे - आरोग्यमंत्री
author img

By

Published : Jun 15, 2021, 12:03 PM IST

पुणे - आशा सेविकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झालेली असतानाही जर आशा सेविका आंदोलन करत असतील तर ते चुकीचे आहे असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्य सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्या वर आहे. अशा परिस्थिती आशा सेविका असे आंदोलन करणार नाहीत असा आहे. असे आरोग्यमंत्री टोपे पुण्यात बोलत होते.

आशा सेविकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली असतानाही आंदोलन करणे चुकीचे - आरोग्यमंत्री

आंदोलन करू नये -

आशा सेविकांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्या कामगार युनियन प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा झालेली आहे. या बैठकीनंतर आशा सेविका यांचे आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्यांच्या समस्याबाबत राज्य सरकारने विचार करण्याचे आश्वासन दिलेले असताना देखील आशा सेविका आंदोलन करत असतील, तर ते योग्य नाही असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले. राजेश टोपे मंगळवारी पुण्यातल्या वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट येथे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आशा सेविकांच्या प्रश्न आंदोलनावर भाष्य केले. राज्यात आशा सेविका आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्यभर आशा सेविकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आता आंदोलन छेडले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलते होते.

मागण्यांवर विचार होईल -

राज्य सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यभर संवेदनशील काम करत असलेल्या 60 हजार आशा सेविका आंदोलन करणार नाही. आता विश्वास असल्याचे राजेश टोपे म्हणाले. आशा सेविकांच्या संघटनेनेकडून चर्चेदरम्यान आंदोलन करणार नाही, चर्चेबाबत समाधानी असल्याचे सांगण्यात आले होते. तरीदेखील जर आंदोलन करण्यात येत असेल तर ते चुकीचे आहे. असे टोपे म्हणाले.

सविस्तर चर्चा झालेली आहे-

आशा सेविकांंना सर्व सोयी दिल्या जात आहेत. त्यांना राज्य सरकार कडून 2 हजार रुपये तर केंद्र सरकारकडून 2 हजार आणि कोविड भत्ता 1 हजार रुपये दर महिन्याला दिला जातो. असे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच आशा सेविकांंनी ज्या मागण्या केल्या त्यातल्या एक दोन मागण्यांबाबत मुख्यमंत्र्याशी बोलून मार्ग काढू मात्र त्यांनी आंदोलन करू नये, असे राजेश टोपे म्हणाले.

हेही वाचा - आजपासून ६८ हजार आशासेविका संपावर; दिवसाला ५०० रुपये मानधन देण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.