पुणे Rajan Khan Son suicide : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील तळेगाव दाभाडे परिसरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आलीय. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. डेबू राजन खान असं या युवकाचं नाव आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं मोठी खळबळ उडालीय.
बेडरुममध्ये केली आत्महत्या : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या 28 वर्षीय मुलानं आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आलाय. लेखक राजन खान यांचा मुलगा डेबूनं नुकतीच अभियंता क्षेत्रातील पदवी प्राप्त केली होती. यानंतर तो सोमटने फाटा इथं एकटाच राहत होता. मात्र, सोमवारी सकाळपासून त्यानं घराचं दार उघडलंच नाही. हे पाहून दुपारी घरमालकांनी डेबूच्या भावाबरोबर संपर्क साधला. डेबूच्या भावानं त्याच्या घराचं दार ठोठावूनही त्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं त्यानं थेट तळेगाव पोलिसांशी संपर्क साधून त्यांना बोलवलं. त्यानंतर पोलिसांनी घराचं दार तोडून आत प्रवेश केला असता, बेडरूममध्ये त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय.
चिठ्ठीत आर्थिक व्यवहाराचा उल्लेख : डेबूनं लिहिलेल्या चिठ्ठीत आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचं आणि त्यातून फटका बसल्याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर ज्या लोकांसोबत पैश्यांची देवाण-घेवाण केली, त्यांची नावं देखील नमूद केली आहेत. दरम्यान, त्या चिठ्ठीच्या आधारावर तळेगाव पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडं डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह ज्येष्ठ लेखक राजन खान यांना देण्यात आला आहे.
हेही वाचा :