ETV Bharat / state

मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे - 'चंपा'ची चंपी करणार राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात प्रचारसभा सुरू आहे. या सभेत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार असे ते म्हणाले.

राज ठाकरे
author img

By

Published : Oct 14, 2019, 8:31 PM IST

Updated : Oct 14, 2019, 10:13 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात प्रचारसभा सुरू आहे. या सभेत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार असे ते म्हणाले. पुण्यातील मंडईमध्ये राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पुण्यातील तसेच राज्यातील पुरावर भाष्य करताना राज्यात एवढा पूर आला की, कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, अशी टीका राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. कोथरूड मतदारसंघातून यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. मनसेने कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर

राज ठाकरे यांची आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. शिवसेनेवरही त्यांनी जोरदार टीका केली. शिवसेना म्हणजे लाचार, भाजपसोबत इतकी वर्षे सडली आणि १२४ वर अडली, बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती, असेही ते म्हणाले.

लाईव्ह अपडेट

  • बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती
  • शिवसेना म्हणजे लाचार, भाजपसोबत इतकी वर्षे सडली आणि १२४ वर अडली
  • चंद्रकात पाटीलांचा 'चंपा' म्हणून उल्लेख
  • कोल्हापुरातील मंत्री कोथरूडला वाहत आला - राज ठाकरे
  • महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 14, 2019, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.