ETV Bharat / state

लाठीहल्ला दुर्दैवी, कर्णबधीर मुलांचा सरकारला शाप लागेल - राज ठाकरे - पुणे पोलीस3

विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर सोमवारी सकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला

राज ठाकरे
author img

By

Published : Feb 26, 2019, 7:43 AM IST

पुणे - ज्यांना बोलता येत नाही, अशा मुलांवर लाठीहल्ला करणे ही दुर्दैवी बाब आहे. या आंदोलकांचा शाप नक्की सरकारला लागेल. या लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुख्यंमत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर सोमवारी सकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता राज ठाकरेंनीही या तरुणांची रात्री भेट घेतली. यावेळी या कर्णबधीर तरुणांनी इशारा करत ठाकरेंशी संवाद साधला. हक्कासाठी मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे मुले शिकण्यासाठी शिक्षकाची मागणी करत आहेत. याच्या मागण्या मान्य करायचे सोडून हे सरकार त्यांच्यावर लाठीहल्ला करत आहे. आता या सरकारला आधीच्या सरकारला दोष देण्याचाही अधिकार नाही, असे खडे बोल ठाकरेंनी यावेळी सुनावले.

आपल्या विविध मागण्यांसाठी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी पुण्यात मोर्चा काढला होता. या मोर्चावर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. सध्या हे तरुण समाजकल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा या आंदोलकांनी इशारा दिला आहे.

undefined

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.