ETV Bharat / state

महादेव वन परिसरातून येणारे पावसाचे पाणी थेट भीमाशंकर मंदीरात, भाविकांचे हाल

मुसळधार पावसामुळे मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या डोंगर व महादेव वनातील पाणी आता थेट भीमाशंकर मंदिरात जात आहे.

मंदिरात जाणारे पाणी
author img

By

Published : Aug 5, 2019, 5:07 AM IST

Updated : Aug 5, 2019, 5:47 AM IST

पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर येथे श्रावणानिमित्ताची यात्रा सुरू असून मागील 24 तासांपासून भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या डोंगर व महादेव वनातील पाणी आता थेट भीमाशंकर मंदिरात जाऊ लागल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाचे पाणी थेट भीमाशंकर मंदीरात

भीमाशंकर मंदिराच्या मागील बाजूस असणारे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या ओढ्या नाल्यातील पाणी आता थेट मंदिरात जाऊ लागल्याने आजूबाजूला असणाऱ्या दुकानांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तर दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रत्येक वर्षी थेट मंदिरात येणारे पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात कुठलीच उपाययोजना केली जात नसल्याने मंदिराच्या मागील डोंगरावरुन येणारे सर्व पाणी थेट मंदिरावर येत आहे. पहिल्या श्रावण सोमवारमुळे भीमाशंकर येथे देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे व मंदिर परिसराच्या आजूबाजूला पाणी झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Intro:Anc__ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भिमाशंकरला श्रावण मासाची यात्रा सुरू असून मागील 24 तासापासून भिमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पावसाची बॅटिंग सुरु आहे त्यामुळे मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या डोंगर व महादेव वनातील पुराचे पाणी आता थेट भिमाशंकर मंदिरावर येऊ लागल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे

भिमाशंकर मंदिराच्या मागील बाजूस असणारे ओढे-नाले दुथडी भरून वाहत असताना या ओढ्या नाल्यातील पाणी आता थेट मंदिरावर येऊ लागल्याने आजूबाजूला असणाऱ्या दुकानांना मोठा धोका निर्माण झाला आहे तर दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे

प्रत्येक वर्षी थेट मंदिरावर येणारे पाणी अडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले जाते मात्र प्रत्यक्षात कुठलीच उपाययोजना केली जात नसल्याने मंदिराच्या मागील डोंगरावरुन येणारे सर्व पाणी थेट मंदिरावर येत आहे सध्याचे विकेंडमध्ये भिमाशंकर येथे देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत मात्र सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे व मंदिर परिसराच्या आजूबाजूला पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहेBody:...Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 5:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.