पुणे : कोयते विक्री (Koyta gang terror) प्रकरणी युनिट 1 ने हुसेन राजगारा या दुकानदाराला अटक (Koyta seller arrested ) केली आहे. पुणे पोलिसांच्या युनिट १ शाखेची ही मोठी कारवाई आहे. हुसेन राजगारा याचे दुकान रविवार पेठेतील बोहरी ओळीमध्ये आहे. (raid on Koyta seller) पोलिसांच्या तपासात राजगारा हा पुण्यातील अनेक तरुणांना कोयते पुरवत असल्याचे निदर्शनास आले होते. (Koyta seized by Police) यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्याच्या दुकानातून १०५ कोयते जप्त करण्यात आले आहेत.
दोघांना अटक : शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या माध्यमातून दहशत माजविली जात आहे. याआधी सिहंगड कॅम्पस येथे दहशत माजवणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील 7 ते 8 जणांकडून अशाच पद्धतीने दहशत माजवण्यात आली होती. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. आता या गँगला कोयता पुरवणाऱ्या दुकानदारावर कारवाई करत कोयते जप्त करण्यात आले आहेत.
कोयता गॅंगवर पोलिसांची नजर : पुणे पोलिसांनी कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याआधी ज्यांनी कोयते घेऊन गुन्हे केले त्यांच्यावर आता प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जे सोशल मीडियावर कोयते घेऊन फोटो टाकत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जात असल्याचे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे अमोल झेंडे यांनी यावेळी सांगितले.
हॉटेलचालकांना धमकी : पुण्यातील भवानी पेठेत तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणत कोयता गँगकडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची 5 ते 6 जणांकडून तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस सुरू आहे.
हॉटेल निशा रेस्टॉरेंटवर हल्ल्याचा प्रयत्न : तक्रारदार मोनिष म्हेत्रे हे त्यांच्या कुटुंबासह भवानी पेठेत राहत असून ते राहत असलेल्या बिल्डींगचे तळमजल्यावर त्यांच्या मालकीचे हॉटेल निशा रेस्टॉरेन्ट 388 भवानपिठ प्लॅट नं 105 तळमजला हे खूप जुने आहे. हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत चालू असते. हॉटेलमध्ये चहा नाष्ठा इत्यादी खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. काल 5 जानेवारीला नेहमी प्रमाणे त्यांनी हॉटेल उघडले व ग्राहकांना पदार्थांची विक्री करत होते.
कोयता गॅंगची दहशत केव्हा संपणार : तक्रारदार मोनिष म्हेत्रे सांगितले की, दुपारी साडे तीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गर्दी कमी असल्याने माझ्या हॉटेल मध्ये कामगार संतोष, आझीम हे हॉटेलमध्ये ग्राहक पाहत होतो. मी हॉटेल समोर पार्किंगच्या ठिकाणी बसलो होतो. त्यावेळी टू व्हीलर गाडीवरून पाच ते सहा मुले आली त्यांनी तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घातलेली होती. त्याचे हातात लोखंडी कोयता, हॉकी व रॉड होते. ते आमचे हॉटेलमध्ये गेले त्यावेळी मी काउंटर दिसलो नाही. म्हणून ते परत बाहेर आले व मला पाहून त्यातील तिघेजण माझ्या अंगावर पार्किंगमध्ये धावून आले व त्यानी मला शिवीगाळ करून मला म्हणाले की " तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का ? असे ते म्हणाले. त्याचे वय अंदाजे 25 ते 26 अंगाने सडपातळ अंगात जीन्स पेन्ट तोंडावर रुमाल बांधलेले होते व हॉटेलच्या आतमध्ये दोन ते तीन जणांनी तोडफोड करून नुकसान केली. सर्वजण तिथून निघून जाताना माझ्याकडे रागाने मला पाहून शिवीगाळ केली, असे तक्रारदार मोनिष म्हेत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घटनेचा तपास पोलिस करत आहे.