पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तयार होत होते, तेव्हा माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी होत असलेल्या पक्षांच्या बाजूने बोलत होते. मात्र, ज्यावेळी सरकार स्थापन झाले तेव्हा सरकारच्या शपथविधीत त्यांना मंत्रिपद देण्याचे बाजूलाच राहिले. पण, साधे निमंत्रणसुद्धा शेट्टींना दिले नाही. महाविकास आघाडीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असा टोला शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी लगावला.
शेतकऱ्यांसाठी कधीकाळी एकजुटीने लढणारे नेते आता एकमेकांवर शेतकऱ्यांमध्ये बसून टीका करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राजू शेट्टींनी सरकारचे कौतूक केले. त्यानंतर त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले नाही. त्यामुळे त्यांनी सरकारला नावे ठेवायला चालू केले, अशी शेट्टींची दुटप्पी भुमिका काय कामाची, असे मत पाटलांनी व्यक्त केले.
सत्तेची लालच दाखवून आमच्यात फूट पाडण्याचे काम मागील काळापासून सुरु आहे. सत्तेच्या मागे पळणाऱ्या नेत्यांना त्यांची किंमत महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिली आहे, असा टोला पाटलांनी लगावला.