ETV Bharat / state

R Madhavan Selection : आर. माधवन यांच्या निवडीमागे राजकारण...'एफटीआयआय'चे विद्यार्थी नाराज

R Madhavan Selection : प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन (R Madhavan Election as FTII president) यांची निवड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी करण्यात आली आहे. (FTII students displeasure) मात्र, संस्थेतील विद्यार्थी या निवडीवर नाराज आहेत. या निवडीमागे राजकीय हस्तक्षेप कारणीभूत असल्याचं विद्यार्थी म्हणाले. (FTII students allegation)

R Madhavan Election
आर. माधवन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 9:24 PM IST

आर माधवन यांच्या अध्यक्षपदी निवडीविषयी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

पुणे R Madhavan Selection : देशातील प्रसिद्ध अशा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन यांची (R Madhavan Slection as FTII president) निवड करण्यात आली आहे. आर. माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (FTII students displeasure) उपसचिव धनंजय कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यांच्या या निवडीनंतर 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांनी नाराजी जाहीर करत या निवडीमागे राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचं सांगितलं आहे. (FTII students allegation)

आर माधवन यांनी स्वीकारला कार्यभार : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)च्या नियम 3 (1)1 आणि 22 (1) नुसार प्रसिद्ध अभिनेता रंगनाथन माधवन यांची 'एफटीआयआय'चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी 'एफटीआयआय'च्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष देखील माधवन हे असतील असं आदेशात म्हटलं आहे.

पण अध्यपदी निवड चुकीची : त्यांच्या या निवडीनंतर 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, यापेक्षा देखील चांगली निवड करण्यात आली असती. 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदासाठी कला क्षेत्रातून निवड झाली पाहिजे. आर माधवन हे अभिनेता म्हणून चांगले आहेत. पण फक्त अध्यक्ष म्हणून नाही तर त्यापेक्षाही अधिकच काम हे त्यात असतं आणि फक्त अभिनेता म्हणून नाही तर त्या माणसाला फिल्म्स जगता बाबत अधिक माहिती देखील असणं गरजेचं आहे. त्यांच्यापेक्षा इतर लोक चांगला पर्याय होऊ शकले असते, असे देखील यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

विद्यार्थी म्हणतात, राजकीय हस्तक्षेप झाला : आर माधवन यांच्या निवडीमागे राजकीय हस्तक्षेप झाला आहे, असे वाटतं का असं यावेळी विद्यार्थ्यांना विचारलं असता ते म्हणाले की, हो असं वाटत आहे की राजकीय हस्तक्षेप झाला आहे. कारण एवढे चांगले-चांगले लोक असताना अशा पद्धतीने जर निवड होत असेल तर असं वाटत की यात राजकीय हस्तक्षेप झाला आहे.

हेही वाचा:

  1. Kerala Story at FTII : FTII मध्ये 'केरला स्टोरी'वरून राडा, स्क्रीनिंगवेळी 'जय श्रीराम'च्या घोषणा
  2. BBC Documentary On Modi : एफटीआयआयमध्ये बीबीसीच्या मोदींवरील 'त्या' डॉक्युमेंटरीचे स्क्रिनिंग
  3. पुण्यात JNU हिंसाचाराचा निषेध, FTII मध्ये विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.