ETV Bharat / state

पुण्याच्या चार वर्षीय रुद्राणीने भैरवगड केला सर; हिरकणी म्हणून मिळाली नवी ओळख - Bhairavgad fort is located in the Sahyadri mountains

सह्याद्रीच्या कुशीत गिर्यारोहण करण्यासाठी अनेक गड किल्ले आहेत. अनेक गिर्यारोहक या गडकिल्ल्याची चढाई करतात. त्याच प्रमाणे पुण्यातील एका चार वर्षाच्या चिमुकलीने ठाणे जिल्ह्यातील भैरवगढ सर केला आहे.

bhairav gad
रुद्राणीने सर केला खडतर प्रवासाचा भैरवगड
author img

By

Published : Dec 23, 2020, 10:08 AM IST

Updated : Dec 23, 2020, 10:19 AM IST

पुणे - गड किल्ले भ्रमंतीचे वेड अनेकांना असते, त्यासाठी वय अपवाद ठरत नाही. जुन्नर तालुक्यातील धोलवड गावातील एका चार वर्षाच्या चिमुकलीने ठाणे जिल्ह्यातील मोराशी येथील अतिशय अवघड चढण असेलला भैरवगड सर केला आहे. रूद्राणी गणेश दिघे असे त्या गिर्यारोहक आणि गडप्रेमी चिमुकलीचे नाव आहे. रुद्राणीच्या या कामगिरीमुळे तिला आता लहान वयात गड किल्ले सरकरणारी "हिरकणी" म्हणून नवी ओळख मिळाली आहे.

भैरवगडाची चढाई करत असताना अवघड तटाच्या ठिकठिकाणी हुक लावण्यात आले आहेत. या हुकांचा आश्रय घेत रुद्राणीने न घाबरता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भैरवगड सर केला आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर कुठलाही प्रकारचा तणाव न दाखवता तिने यशस्वीपणे भैरवगड सर केला. गडावर पोहोचल्यावर रुद्राणीने -छत्रपती शिवरायांचा भगवा झेडा फडकवत मोहीम फत्ते केल्याचा आनंद व्यक्त केला.

रुद्राणीने सर केला खडतर प्रवासाचा भैरवगड
लिंगाणा गड सर करण्याचे स्वप्न-

भैरवगड सर करण्याच्या मोहिमेत रुद्राणीसह एकूण चौदा जणांचा समावेश होता. मात्र यामध्ये रुद्राणी ही एकटीच सर्वांत लहान होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि हर हर महादेव च्या घोषणा देत गडाच्या दिशेने जात असताना अधिकच ऊर्जा येत असल्याचे रुद्राणीने सांगितले. लहान वयात रुद्राणीने आतापर्यंत किल्ले हडसर, चांवड, लोहगड, विसापूर आणि किल्ले जीवधन यशस्वीपणे सर केले असून भविष्यात चढाईसाठी अत्यंत दुर्गम समजला जाणारा लिंगाणा गड सर करणार असल्याचे रुद्राणीने सांगितले.

लिंगाणा किल्ला -

लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर आहे सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांच्या दरम्यान या किल्ल्याचे स्थान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत. गिर्यारोहकांसाठी अतंत्य अवघड चढणीचा किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे.

Last Updated : Dec 23, 2020, 10:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.