ETV Bharat / state

Pune Bandh Update : पुणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; महापुरूषांबाबतच्या अवमानाच्या निषेधार्थ पुकारला होता बंद

author img

By

Published : Dec 13, 2022, 10:04 PM IST

Updated : Dec 13, 2022, 10:54 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj  ) यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधान ( Governor Bhagat Singh Koshyari controversial statements ) आणि महापुरुषांबाबत राजकीय नेत्यांकडून सातत्याने होणारा अवमानाच्या निषेधार्थ आज ( 13 डिसेंबर ) पुण्यात बंद पुकारण्यात आला होता. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान या बंदला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद ( Large response received ) मिळाला.

Pune Bandh
Pune Bandh

पुणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ( Governor Bhagat Singh Koshyari controversial statements ) केले होते. महापुरुषांबाबत राज्यपाल व राजकीय नेत्यांकडून सातत्याने होणारा अवमानाच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी मंगळवारी पुकारलेल्या पुणे बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत हा बंद पुकारण्यात आला होता. यानंतर शहरातील सर्वच दुकाने सुरू झाले आहे.

सकाळी 7 ते 3 वाजेच्या दरम्यान बंद : शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही देखील बंद कडकडीत पाळण्यात आले होते. बाजारपेठा, महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड अशी महत्वाच्या ठिकाणीही व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने, गाळे व व्यवसाय बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदविला. तर नेहमी बंदच्यावेळी सुरु राहणारे हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, स्वीट होम्स, डेअरी, खानावळी अशा व्यावसायिकांनी देखील आपले व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये आपला सहभाग नोंदविला. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. दुपारी तीन वाजल्यानंतर व्यावसायिकांनी हळूहळू त्यांची दुकाने, कार्यालये, कंपन्या,हॉटेल सुरू केल्या.

नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यबद्द्ल अवमानकारक शब्द वापरून छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याचा निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी निघालेल्या मुकमोर्चात 1 लाख नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच जो आज बंद पुकारण्यात आला होता या बंदमध्ये भाजप आणि मनसे वगळता सर्वच राजकीय पक्षांचे लोक, व्यापारी, सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आजचा पुणे बंद कडकडीत पाळण्यात आला असून 4 वाजेपर्यंत सर्वच लोक बंदमध्ये सहभागी झाले होते.

पुणे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरातील वाहतूक मंदावली : आज कडकडीत बंद असल्याने सकाळपासूनच शहरातील वाहतूक मंदावली होती. विशेषतः प्रवाशांचा अभाव असल्याने पीएमपीएल बस देखील रस्त्यावर कमी कामगारांच्या बस, पीएमपी बस, स्कुल व्हॅन, रिक्षा यांचे प्रमाण कमी झाल्याने रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळही कमी झाली. रस्त्यावर नागरीकांची वर्दळ कमी असल्याने पीएमपीच्या फेऱ्यांवरही परिणाम झाला होता.

Last Updated : Dec 13, 2022, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.