ETV Bharat / state

Pune ZP meeting : पुणे जिल्ह्यात नामांतराचे वारे.. मळवली रेल्वे स्टेशनला एकवीरा आणि वेल्हा तालुक्याला राजगड नावाला मंजुरी - मळवली रेल्वे स्टेशनचे एकवीरा नामकरण

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.

Pune ZP meeting
Pune ZP meeting
author img

By

Published : Nov 23, 2021, 4:13 PM IST

Updated : Nov 23, 2021, 4:31 PM IST

पुणे - पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड (Velha taluka as Rajgad) करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे (Malvi railway station as Ekvira) नाव देण्यात यावे, अशा आशयाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे दोन्ही ठराव पुढील मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव (Velha taluka as Rajgad ) उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मांडला. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमताने पाठिंबा दिला. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर केला. मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील सर्वांचे श्रद्धास्थान आहे. या तालुक्यात मळवली येथे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनला एकवीरा देवीचे (Malvi railway station as Ekvira) नाव द्यावे, अशी मागणी करणारा ठरावही करण्यात आला आहे.

मळवली रेल्वे स्टेशनला एकवीरा आणि वेल्हा तालुक्याला राजगड नावाला मंजुरी
वाबळेवाडी शाळेचे दत्तात्रय वारे गुरुजी यांचे निलंबन -
शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलचे माजी प्रभारी मुख्याध्यापक आणि विद्यमान सहशिक्षक दत्तात्रेय वारे यांना त्यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करा, असा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.
चौकशी सुरु होताच वारे मुख्याध्यापक पदावरून दूर -
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेजस प्रकल्पांतर्गत या शाळेची निवड केली होती. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांकडून देणगी घेण्यासाठी खास बाब म्हणून या शाळेला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर याच शाळेच्या धर्तीवर राज्यातील १०० शाळांची ओजस प्रकल्पांतर्गत निवड करून त्या शाळांमधील गुणवत्ता वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतर वाबळेवाडी शाळेला इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा देण्यात आला होता. आता राज्य सरकारनेही हा दर्जा काढून घेतला आहे. दत्तात्रेय वारे हे या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार नियमानुसारच शाळेला देणग्या घेतल्या होत्या, असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. परंतु त्यांनी या स्वतःच्या नावावर सुमारे साडेआठ कोटी रुपये किमतीची जमीन खरेदी केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानंतर स्थानिक विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश मिळत नसल्याची तक्रार एका पालकाने जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीनंतर त्यांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरु होताच, त्यांना प्रभारी मुख्याध्यापक पदावरून दूर केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Last Updated : Nov 23, 2021, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.