ETV Bharat / state

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सिम्बॉयसिसचे रुग्णालय उपलब्ध करा - सरकारकडे मागणी - पुणे जिल्हा परिषद

रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागात ३० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.

pune zp demands to state government about corona
संशयित कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सिम्बॉयसीसचे रुग्णालय उपलब्ध करून द्या; पुणे जिल्हा परिषदेची राज्य सरकारकडे मागणी
author img

By

Published : Mar 30, 2020, 9:56 PM IST

पुणे - जिल्ह्यातील संभाव्य संशयित कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुळशी तालुक्यातील लवळे येथील सिम्बॉयसिस रुग्णालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील संभाव्य रूग्णांवर या रुग्णालयात उपचार करणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागात ३० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.

पुणे - जिल्ह्यातील संभाव्य संशयित कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुळशी तालुक्यातील लवळे येथील सिम्बॉयसिस रुग्णालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील संभाव्य रूग्णांवर या रुग्णालयात उपचार करणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागात ३० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही या प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.