पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात जादूटोणा करुन अघोरी पूजा केली जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य केल्याचे समोर आले होते. यानंतर आता पुण्यातील धायरी परिसरात घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी व मुल बाळ व्हावे यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
रुपाली चकणकर : विद्येच्या माहेरघर असलेल्या पुणे शहरात आघोरी कृत्य घडलेले आहे. यात पैश्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आलेला आहे.या महिला अंधश्रध्देच्या माध्यमातून मानवी हाडांची राख खाऊ घालण्यात आलेला आहे. मुल होत नसल्याच्या कारणांमुळे अश्या पद्धतीने आघोरी पूजा करण्यात आली आहे. या बाबत सिंहगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच यात सशक्त दोषारोपत्र दाखल होणे देखील महत्त्वाचे आहे. अश्या घटना घडू नये म्हणून समाजातील विविध घटकांडकडून समुपदेशनाच कार्यक्रम देखील राबविले जातात.अस असताना देखील अश्या घटना घडत आहे.आणि हे खूप लाजिरवाणी गोष्ट असून महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आयोगाने सिंहगड पोलीस स्टेशन येथे कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. असे यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चकणकर यांनी म्हटले आहे.
नातेवाईकांवर गुन्हा दाखल : या प्रकरणी पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि लता जाधव (सर्व रा-पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वर्षीय सुनेने सिंहगड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 2019 पासून सुरू होता.
महिलेकडून पैशांची मागणी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेला लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. याबरोबरच सासर चे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी अनेक वेळा मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करायचे. घरात भरभराटी व्हावी तसेच महिलेला मुलगा व्हावे यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून अघोरी पूजा आणि जादूटोणा करून पूजा देखील केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसात धाव घेतली. सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असून पोलिसांनी भारतीय दंडात्मक कलम ४९८ (अ), ३२३, ५०४,५०६/२, ३४ सह महाराष्ट्र नरबळी व अमानूष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुत्र प्राप्तीसाठी अघोरी पूजा : काही दिवसांपूर्वी घरच्यांनी पुत्र प्राप्तीसाठी महिलेवर अघोरी पूजा केली. यामध्ये कोंबडी, बोकडे कापण्यात आले. तसेच स्मशानभूमीतील मानवी हाडांची राख खावू घातली. हे महिलेला अखेर सहन न झाल्याने पीडित महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. सासरच्या लोकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जादूटोणाविरोधी कायदा काय आहे ? : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारने 2013 साली तडकाफडकी जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला. या आधी हा कायदा पास व्हावा म्हणून दाभोलकरांनी 2010 पासून अनेक प्रयत्न केले होते. याच कायद्याचा मसुदा त्यांच्याच अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थेने तयार केला होता. अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हा कायदा 'हिंदू-विरोधी' आहे असे म्हणत याला विरोध केला होता. संसदेच्या सलग सात अधिवेशनांमध्ये यासंबंधी बिल मांडले गेले होते पण दाभोलकरांच्या मृत्यूआधी हा कायदा पास होऊ शकला नाही.
हेही वाचा : Dog Killed : अंधश्रद्धेचा कळस! चक्क कुत्र्याला दगडावर आपटत दिला बळी