पुणे - शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येसोबतच मृत्यूची संख्याही वाढत आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांचं सहकार्य मिळत नसल्याने शहरात मिनी लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. 30 एप्रिल पर्यंत अंशतः संचारबंदी आहे तर शनिवार आणि रविवारी संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली आहे. उद्या (शनिवार) आणि रविवारी शहरात काय सुरु आणि काय बंद राहणार ते पुढीलप्रमाणे...
:- दूध केंद्र (सकाळी 6 ते सकाळी 11) सुरू राहील
:- वैद्यकीय सुविधा सुरू राहणार
:- भाजीपाला दुकान / मंडई बंद
:- हॉटेल, बार, रेस्टॉरंट मधून घरपोच पार्सल सेवा मिळणार
:- स्विगी आणि झोमॅटो यांच्यामार्फत पार्सल सेवा सुरू राहील
:- घरेलू कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, जेष्ट नागरीक, वैद्यकीय मदतनीस यांना सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवास करता येईल
:- स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मेस मधून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल घेता येणार
:- PMPL सेवा अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार
:- अत्यावश्यक सेवा कारणास्तव ओला / उबेर सुरू राहणार
:- कामगारांना प्रवास करताना RTPCR प्रमाणात सोबत बाळगावे लागणार
:- कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरू राहणार