पुणे - कोंढवा येथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन बिल्डरला अटक केली आहे. या प्रकरणात कोंढवा पोलीस उपनिरीक्षकांने तक्रार दिली होती. त्यानुसार आठ बिल्डर, साईट इंजिनियर सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या आठ बिल्डरपैकी विपुल आणि विवेक अग्रवाल या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे, तर इतरांचा शोध पोलीस घेत आहे. अल्कोन लँडमार्कस डेवहेल्पर्सचे बिल्डर जगदीशप्रसाद तिलकचंद अग्रवाल (वय 64), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (वय 34), राजेश जगदिशप्रसाद अग्रवाल (वय 27), विवेक सुनिल अग्रवाल (वय 21), विपुल सुनिल अग्रवाल (वय 21) तसेच कांचन बिल्डरचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या बिल्डरवर तसेच साईट इंजिनियर, सुपरवायझर, कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर भारतीय दंड विधान 304 /34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.