पुणे - देशात दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय असलेल्या एकूण पाच आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या एटीएस करत होते. मात्र, आता हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी(8 ऑगस्ट) पुणे विशेष न्यायालयाने (Pune Terror Module to NIA) दिले आहेत. त्यामुळे आता यापुढील तपास एनआयए करणार आहे.
-
A special court in Pune transfers the Pune terror module case probe to the National Investigating Agency (NIA) from Maharashtra ATS. Till now, five accused have been arrested in the case.
— ANI (@ANI) August 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A special court in Pune transfers the Pune terror module case probe to the National Investigating Agency (NIA) from Maharashtra ATS. Till now, five accused have been arrested in the case.
— ANI (@ANI) August 8, 2023A special court in Pune transfers the Pune terror module case probe to the National Investigating Agency (NIA) from Maharashtra ATS. Till now, five accused have been arrested in the case.
— ANI (@ANI) August 8, 2023
देशात बॉम्बस्फोटाचा होता कट - 'एटीएस'कडून अटक करण्यात आलेल्या पाचही संशयित दहशतवाद्यांचा देशातील काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट होता. तशा पद्धतीचे मॅप त्यांच्याकडून मिळाले आहेत, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात समोर आली होती. न्यायालयाने यातील चार दहशतवाद्यांच्या पोलीस कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
गाडी मालकाची चौकशी - पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांनी ज्या गाडीचा वापर केला त्या गाडी मालकाचीदेखील एटीएसने चौकशी केली आहे. मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे मुंबईतून पळून पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात चारचाकी खरेदी केली होती. ज्या व्यक्तीकडून ही चारचाकी घेण्यात आली होती त्याची एटीएसने चौकशी केली आहे. याच गाडीत २ पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसे एटीएसला आढळली होती.
प्रकरणाला कशी झाली सुरुवात? - कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असताना पुणे पोलिसांनी महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय 23, रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ- रतलाम, मध्य प्रदेश) आणि महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय 24) यांना अटक केली होती. पकडण्यात आलेल्या या दोघांचा ताबा एटीएसने घेतल्यानंतर या दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोटची चाचणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासात या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32 रा, कोंढवा) याला तर यांना आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय 27) याला देखील एटीएसने अटक केली होती.
झुल्फिकार अली बडोदावाल्याचा सहभाग - या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या कटात झुल्फिकार अली बडोदावाल्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर त्याला देखील एटीएसने ताब्यात घेतले होते. बडोदावाला याने पठाण व काझीच्या माध्यमातून दहशतवादी कारवाईसाठी आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएसने त्याला एनआयएच्या गुह्यातून वर्ग करून घेतले आहे.
हेही वाचा -
- Bomb Blast Planning : देशातील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाचा होता कट; पुण्यातील दहशतवाद्यांच्या चौकशीत मोठे खुलासे
- ATS Arrested Bangladeshi Nationals : एटीएस पथकाकडून सात बांगलादेशी नागरिकांना अटक; बलात्काराच्या वॉन्टेड आरोपीचाही समावेश
- Pune Terrorist News: पुण्यात पकडलेल्या 'त्या' दहशतवाद्यांचा प्रमुख झुल्फिकार अली बडोदावाला आता पुणे एटीएसच्या ताब्यात