ETV Bharat / state

बिबट्यापासून संरक्षण करणारी प्लास्टिकची तोफ!

आंबेगाव तालुक्यातील राजणी गावात शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलाने बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. अमन भंडारी याने मोठा आवाज करणारी एक तोफ बनवली आहे.

प्लास्टिकची तोफ
प्लास्टिकची तोफ
author img

By

Published : Dec 22, 2019, 5:27 PM IST

Updated : Dec 22, 2019, 8:33 PM IST

पुणे - बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या किंवा मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडतात. आंबेगाव तालुक्यातील राजणी गावात शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलाने बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. अमन भंडारी असे या मुलाचे नाव आहे.

बिबट्यापासून संरक्षण करणारी प्लास्टिकची तोफ

अमन हा नरसिंह विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. त्याने बिबट्यापासून संरक्षण मिळण्यासाठी प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून मोठा आवाज करणारी तोफ तयार केली आहे. बिबट्या आणि मानवातील वाढलेला संघर्ष लक्षात घेऊन त्याने ही तोफ बनवली.

हेही वाचा - 'अशा जगाची प्रतिक्षा जिथे मी सुरक्षित राहू शकेल', 'बिग बीं'च्या नातीचं दमदार सादरीकरण

घरातील खराब झालेले पीव्हिसी पाईपचे तुकडे, कॅल्शियम कार्बाइड, पाणी आणि लायटरचा वापर करून तयार केलेली ही तोफ फटाक्यांपेक्षाही मोठा आवाज काढते. अमनच्या या अनोख्या कल्पनेला त्याच्या शिक्षकांनी पाठिंबा दिला, त्यामुळे त्याची कल्पना सत्यात उतरली.

विज्ञान प्रदर्शनात भाग घेवून अमनने या तोफेचे प्रात्याक्षिकही दाखवले आहे. वनविभागानेही त्याच्या या उपकरणाचे कौतुक केले. बिबट्या हा मोठ्या आवाजाला घाबरणारा प्राणी आहे. मोठा आवाज ऐकल्यानंतर बिबट्या ती जागा लगेच बदलतो, त्यामुळे या तोफेचा वापर करून आपले संरक्षण करणे सहज शक्य होणार आहे.

Intro:Anc_ पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या तालुक्यात बिबट आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असताना राजणी गावातील शालेय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने बिबट्या पासून संरक्षण मिळावे यासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट....

Vo_रांजणी गावात नरसिंह विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारा हा अमय भंडारी आता संशोधक बनलाय लहानपणापासून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द या तरुणात होती त्यातूनच बिबट व मानवातील वाढलेला संघर्ष लक्षात घेऊन शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनातून अमयने बिबट्या पासून संरक्षण मिळण्यासाठी प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून मोठा आवाज करणारी तोप हे उपकरण तयार केलंय

Byte:अमन भंडारी(तोफ बनवणारा विद्यार्थी)

Vo...बिबट्या म्हटलं कि प्रत्येकाच्या मनात धडकीच भरते त्यातून पुणे जिल्ह्यात हा बिबट दररोज पाळीव प्राणी माणसांवर जीवघेणे हल्ले करत असल्याने बिबट्या पासून आपले संरक्षण व्हावे यासाठी घरगुती टाकावू वस्तु पासून मोठा आवाज करणारी तोफ अमय या तरुणाने बनवली आहे या तोफेच्या प्रात्याक्षिकाची विज्ञान प्रदर्शनात भाग घेवून मांडणी केल्याने वनविभागाने या उपकरणाचे कौतुक केलेय..बिबट हा मोठ्या आवाजाला घाबरणारा प्राणी असून मोठा आवाज ऐकल्यास बिबट ती जागा बदलतो त्यामुळे या तोफेचा वापर करून आपलं संरक्षण करणे सहज शक्य होणार आहे

Byte:विजय वेलकर(वन अधिकारी)

Vo... अमनच्या मनात नेहमी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द होती आणि याच जिद्दीतून त्याने आपल्या ज्ञानाचा वापर करत घरातील खराब झालेले पिव्हिसी पाईपचे तुकडे घेवून या पाईपांसोबत लाईटर कॅल्शियम कार्बाइड पाणी यांच्या माध्यमातून फटाक्यापेक्षाहि मोठा आवाज करणारी तोफ बनवली आहे..

Byte:नंदकुमार भालेराव(शिक्षक)

Vo..बिबट्या हा अतिषय चपळ भक्ष्यक प्राणी असून बिबट्या चे वास्तव हे जंगलात असते मात्र गेल्या अनेक दिवसापासून माणसाने बिबट्याच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्याने बिबट्याने लोकवस्तीचा आश्रय घेतला आणि ऊसाच्या शेतात वास्तव्य करू लागला त्यात शिकारीच्या हेतूने पाळीव प्राणी माणसांवर हल्ले करू लागला त्यामुळे बिबट आणि माणसातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि या बिबट्याची माणसाच्या मनात एक वेगळी दहशत निर्माण झाली आहे

End Vo_ सध्याच्या तरुणांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून संशोधन करण्याची क्षमता आहे मात्र त्यांच्या बौद्धिक क्षमतेला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर अजूनही वेगवेगळे प्रयोग करून यशाच्या शिखरावर जाण्यास मदत होईल हेच यानिमित्ताने सांगावे लागेलBody:Pkg तयार करुन दिले आहेConclusion:
Last Updated : Dec 22, 2019, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.