पुणे - शहरात गुरुवारी दिवसभरात ४ हजार १०३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. शहरात दिवसभरात २ हजार ७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात कोरोनाबाधीत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील १४ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या शहरात ८२५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २ लाख ७३ हजार ४४६ झाली आहे. तर सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३५ हजार ८४९ इतकी आहे आणि आतापर्यत एकूण मृत्यू ५ हजार ३३७ तर आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २ लाख ३२ हजार २६० झाले आहेत. शहरात गुरूवारी २० हजार ६९१ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत एकूण ५ लाख ३४ हजार ४११ रुग्णांपैकी ४ लाख ६२ हजार ६९७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ६१ हजार ८३२ आहे. कोरोनाबाधित एकूण ९ हजार ८८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.८५ टक्के इतके आहे. तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ८६.५८ टक्के आहे.
बुधवारच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये ९ हजार ८८४ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ८ हजार ७०६, सातारा जिल्ह्यात ३१४, सोलापूर जिल्ह्यात ६५१, सांगली जिल्ह्यात २३१ तर कोल्हापूर जिल्ह्यात ८१ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
हेही वाचा - लाच घेणाऱ्या महिला न्यायाधिशाला अटक झाल्यामुळे खळबळ
हेही वाचा - नात्यातील विवाहितेवर बलात्कार...बारामती तालुक्यातील शिरसुफळमध्ये घडला प्रकार