ETV Bharat / state

पुणे: भाजपच्या 10 लाख लाडू वाटपाच्या कार्यक्रमाला ब्रेक, पोलिसांनी पाठवली नोटीस - भाजप पिंपरी चिंचवड

लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात येत आहेत. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाडू वाटपाचा कार्यक्रम करू नये, असे पोलिसांनी नोटीसद्वारे कळवले आहे.

bjp pimpri chichwad
भाजपतर्फे बनवण्यात आलेले लाडू
author img

By

Published : Aug 5, 2020, 3:30 AM IST

पुणे- अयोध्येत आज राम मंदिर भूमिपूजन सोहोळा पार पडणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल १० लाख मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांना लाडू वाटपाचा कार्यक्रम करू नये, असे एका नोटीस द्वारे कळवले आहे.

भाजपतर्फे बनवण्यात आलेले लाडू

अत्यंत भक्तीमय वातावरणात आज राम मंदिर भूमिपूजन सोहोळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या सोहोळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार असून त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्यावतीने हा उत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येणार होते. त्यानुसार इंद्रायणीनगर येथील एका मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे.

विशेष म्हणजे, लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच लाडू तयार करण्यात येत आहेत. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाडू वाटपाचा कार्यक्रम करू नये, असे पोलिसांनी नोटीसद्वारे कळवले आहे. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरले जाईल, असे देखील नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाडू वाटपाचा कार्यक्रम होणार की नाही यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे.

हेही वाचा- पुणेकरांना दिलासा.. गणेशोत्सव होईपर्यंत शहरात पाणी कपात नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.