पुणे - घर स्वच्छ करायचे साहित्य विकण्याच्या नावाखाली दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करणाऱ्या बंटी-बबलीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामा पापा जाधव उर्फ रामा सोनाजी कांबळे (वय 25) आणि उषा रामा कांबळे (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेचे कर्मचारी सराईत गुन्हेगारांची माहिती एकत्र करत असताना वरील आरोपी कॅम्प परिसरात दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 45 ग्रॅम सोन्याचे दागिने गुन्हा करण्यासाठी लागणारी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, दुचाकी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून बंटी बबली या कुप्रसिद्ध नावाने ओळखले जातात. त्यांनी पुणे शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क आणि कामशेत परिसरात घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर यापूर्वीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या केल्याचे 26 गुन्हे दाखल आहेत.
दिवसा रेकी करून रात्री घरफोडी; पुण्यातील बंटी-बबलीला अटक - burglar bunty babli arrested in pune
हे दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून बंटी-बबली या कुप्रसिद्ध नावाने ओळखले जातात. त्यांनी पुणे शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, कोरेगाव पार्क आणि कामशेत परिसरात घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर यापूर्वीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या केल्याचे 26 गुन्हे दाखल आहेत.