ETV Bharat / state

पुण्यात बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

अजय शंकरलाल गांधी, मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या त्रिकुटाने १ लाख २ हजार ४१९ रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवले होते.

crime branch pune
बनावट सॅनिटायझर दाखवताना अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे
author img

By

Published : Mar 14, 2020, 10:54 PM IST

पुणे- कोरोनामुळे सरकारने हँड सॅनिटायझरचा समावेश आवश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे या वस्तूची मागणी वाढली आहे. मात्र, याचा फायदा घेत शहरातील काही लोकांनी बनावट सॅनिटायझरचा साठा तयार केला होता. या लोकांवर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने कारवाई केली आहे. संयुक्त पथकांनी दत्तवाडी परिसरात बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या ३ व्यक्तींना अटक केली आहे.

माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे

अजय शंकरलाल गांधी, मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे. या त्रिकुटाने १ लाख २ हजार ४१९ रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवले होते. आरोपींनी यासाठी घरातल्या घरात कारखाना तयार केला होता. त्यासाठी त्यांनी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. आरोपींनी मुंबईतील एका कंपनीतून ५ लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर शहरातील लोकल मार्केटमध्ये विकण्यात आले. कोरोनाचा फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा- BS-4 वाहन घेताना ही घ्या काळजी; 31 मार्चनंतर नोंदणी होणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.