ETV Bharat / state

पुणे महापालिकेची 350 पथके झोपडपट्टीमध्ये करणार तपासणी - विभागीय आयुक्त - कोरोना अपडेट पुणे

शहरात गेल्या 10 ते 15 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जास्तीत जास्त समावेश आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार, दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांचे यामध्ये मृत्यू होत आहेत. त्यामुळे दाटीवाटीची वस्ती असलेल्या झोपडपट्टीमधील ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करण्याला प्राथमिकता दिली जात आहे.

Pune Municipal Corporation  पुणे महापालिका पथक  कोरोना अपडेट पुणे  corona update pune
डॉ. दीपक म्हैसेकर
author img

By

Published : Apr 28, 2020, 2:47 PM IST

पुणे - शहरात महापालिकेकडून सोमवारपासून आरोग्य तपासणी केली जात आहे. शहरातील झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये तपासणीसाठी ३५० पथके तयार केली असून पथकांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेची 350 पथके झोपडपट्टीमध्ये करणार तपासणी

शहरात गेल्या 10 ते 15 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा जास्तीत जास्त समावेश आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार, दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांचे यामध्ये मृत्यू होत आहेत. त्यामुळे दाटीवाटीची वस्ती असलेल्या झोपडपट्टीमधील ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करण्याला प्राथमिकता दिली जात आहे. तपासणी पथकाकडे पल्स अ‌ॅक्सलेटर, थर्मल स्कॅनर यासारखे उपकरण दिले आहेत. त्याद्वारे नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी समोर येऊन या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.