ETV Bharat / state

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हरवला धुक्यात, वाहनांचा वेग मंदावला - fogg

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आज पहाटेपासून धुक्यात हरवला होता. धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली.

pune
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग
author img

By

Published : Jan 3, 2020, 11:38 AM IST

पुणे - राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज (गुरुवार) पहाटेपासूनच धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे द्रुतगतीमार्ग काही वेळ मंदावला होता. गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. अशा वेळेस द्रुतगती मार्गावर पसरलेले धुके वाहन चालकांना आणि प्रवाशांना सुखावणारे आहे. काहींनी आपली वाहने थांबवून या धुक्याचा आनंद घेतला.

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला आज पहाटे धुक्याने वेढले होते. परिणामी पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग धुक्यात हरवला होता. धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली. दिवस उजाडूनही धुक्याची चादर कमी होत नसल्यामुळे अनेकांनी पुढे जाण्यासाठी वाहनांच्या हेडलाईट लावल्या होत्या. मात्र, हेडलाईट देखील धुक्यापुढे निकामी ठरत होते.

हेही वाचा - भरधाव कारला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला ५ जणांचा जीव

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा, पाहा ईटीव्ही भारतसोबत..
.

Intro:Body:mh_pun_01_av_expresway_fog_mhc10002

Anchor:- पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आज पहाटे पासून धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे काही काळ द्रुतगती मार्ग मंदावला होता, वाहने कासवगती धावत होती. गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडी अनुभवला मिळत आहे. अश्या वेळी द्रुतगतिमार्गावर पसरलेले धुकं वाहन चालकांना आणि प्रवाश्यांना सुखावणारे आहे. या धुक्याचा आनंद वाहनचालकांनी मोटारी थांबवून घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला आज धुक्याने वेढले होते. परिणामी पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग धुक्यात हरवला होता. मोठ्या प्रमाणात धुके आल्याने एक्स्प्रेस वे ही मंदावला. वाहन चालकांना अगदी काही अंतरावरील दिसत नव्हते. त्यामुळे त्यांना कसरत करावी लागली. दिवस उजाडला मात्र धुक्याची चादर मात्र कमी होत नव्हती. त्यामुळे अनेकांनी धुक्यातून पुढे जाण्यासाठी वाहनांच्या लाईट लावलेल्या होत्या. गेली अनेक दिवसापासून शहरात थंडीची लाट आहे, आज मात्र या धुक्यामुळं गुलाबी थंडीची चाहूल सर्वांना अधिक अनुभवता आली अस म्हणता येईल.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.