ETV Bharat / state

Pune Metro Expansion: पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाचे 1 ऑगस्टला नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन - पुणे मेट्रो विस्तारित प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पुण्यातील सिव्हील कोर्ट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनचीसुद्धा आता पूर्ण तयारी झालेली आहे.

Pune Metro Expansion
नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
author img

By

Published : Jul 27, 2023, 10:59 PM IST

पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाविषयी बोलताना मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी

पुणे : सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड असा हा विस्तारित मेट्रोचा प्रकल्प आहे. यापूर्वी पिंपरी-चिंचवड फुगेवाडीपर्यंतच मेट्रो होती. नवीन मार्गामध्ये फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इथपर्यंत हा मार्ग असणार आहे. तर दुसरा मार्ग वनाज कॉर्नर ते रुबी हॉल असलेला मेट्रो मार्ग असणार आहे. त्याची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती मेट्रोच्या वतीने देण्यात आलेली आहे.

महत्त्वाचे स्टेशन्स मेट्रोने जोडले जाणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर केवळ पाच किलोमीटर एवढा मेट्रोचा प्रवास होत असल्याने तो पुणेकरांच्या उपयोगाचा नाही, अशी टीका होत होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा जवळपास साडेअकरा किलोमीटरचा मेट्रो प्रवासाचा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडवरून पुणे शहरात येण्यासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली आहे. पुण्यातले महत्त्वाचे स्टेशन्स यापुढे मेट्रोने जोडले जाणार आहेत. त्यासाठीच आज सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनसुद्धा पूर्ण क्षमतने सुरू झाले. याबाबत मेट्रो ट्रेनची चाचणी घेण्यात आली असून, आज मेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले आहे.

दर 10 मिनिटाला मेट्रो सेवा : पुणे मेट्रोचे तिकीट दर कमीत कमी 10 रुपये आणि जास्तीत जास्त 35 रुपये असे सर्वसामान्यांना परवडणारे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दर दहा मिनिटाला गर्दीच्यावेळी मेट्रो असणार आहे. तर कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रो असणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने पत्रकार परिषदेत दिली आहे.

पुणेकरांना होणार मेट्रोचा फायदा : सध्या शहरात पावसाचे प्रमाण जास्त आहे आणि अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे पुणेकरांना मेट्रोचा त्रास जास्त होत असल्याची टीका होत होती. त्यानंतर आता पावसाळ्यातच पुणेकरांना मेट्रोचा फायदासुद्धा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे. 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे उद्घाटन करतील. त्यानंतर तीन तासांमध्ये पुणेकरांच्या सेवेत मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिलेली आहे.

हेही वाचा:

  1. Pune Metro : पुणे मेट्रोचे काम 'या' महिन्यात पूर्ण होणार; सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानका दरम्यान पार पडली चाचणी
  2. Pune Metro : पुणे मेट्रोचं 90 टक्के काम पूर्ण, बघा ड्रोन व्हिडिओ
  3. Video : पुणेकरांसाठी नव्या वर्षात नवा संकल्प, पाहा काय म्हणाले महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.