ETV Bharat / state

पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू - पुणे मनपा

पुणे महापालिकचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पुण्याचे महापौरपद खुल्याप्रवर्गासाठी आरक्षित
author img

By

Published : Nov 13, 2019, 9:19 PM IST

Updated : Nov 13, 2019, 9:25 PM IST

पुणे - राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत बुधवारी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काढण्यात आली. पुणे महापालिकचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर, महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुण्याचे महापौरपद खुल्याप्रवर्गासाठी आरक्षित

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले तेव्हा सर्वसाधारण महिलांसाठी हे महापौरपद आरक्षित झाले होते. त्यामुळे भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून मुक्ता टिळक यांना पक्षाने संधी दिली. टिळक यांचा महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमुळे महापौरपदाच्या कालावधीला मुदतवाढ देण्यात आली. त्यात राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासही उशीर होत आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत बुधवारी प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काढण्यात आली. त्यामध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या सर्वच नगरसेवकांना या पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत.

हेही वाचा - ऑनलाईन बिंगो मटक्यावर छापा; बारामती क्राईम ब्रँचची कारवाई

महापालिकेत भाजपने अडीच वर्षे महिलेला संधी दिल्याने यावेळी पुरुष नगरसेवकाला महापौर पद देण्यात येणार असल्याचे समजते. नगरसेवक मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर, राजाभाऊ लायगुडे, हेमंत रासणे, सुशील मेंगडे, दीपक पोटे, प्रसन्न जगताप यांचीही नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ हे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मोहोळ यांना योग्य ते पद देण्यात येणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यामुळे मोहोळ यांचे नाव देखील महापौर पदासाठी आघाडीवर आहे.

हेही वाचा - त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त एक लाख दिव्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर

Intro:पुण्याचे महापौरपद खुल्याप्रवर्गासाठी आरक्षित
इच्छुकांची मोर्च बांधणी सुरु

पुणे महापालिकचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपमधील इच्छुकांनी मोर्च बांधणी सुरु केली आहे. महापौरपदाची माळ कोणाच्या गळयात पडते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.Body:पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले तेव्हा महापौरपद हे सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाले होते. त्यामुळे भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून मुक्ता टिळक यांना पक्षाने संधी दिली. टिळक यांचा महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येत होता. पण विधानसभा निवडणुकामुळे महापौरपदाच्या कालावधीला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यात राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासही उशिर होत आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यातील २७ महानगरपालिकाच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काढण्यात आली. त्यामध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपच्या सर्वच नगरसेवकांना या पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत.Conclusion:महापालिकेत भाजपने अडीच वर्षे महिलेला संधी दिल्याने यावेळी पुरुष नगरसेवकाला महापौर पद देण्यात येणार असल्याचे समजते. नगरसेवक मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर, धीरज घाटे, राजाभाऊ लायगुडे, हेमंत रासणे, सुशील मेंगडे, दीपक पोटे, प्रसन्न जगताप यांच्याही नावाची महापौर पदासाठी चर्चेत आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ प्रबळ दावेदार होते. त्या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मोहोळ यांना योग्य ते पद देण्यात येणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यामुळे त्यांचे नाव महापौर पदासाठी आघाडीवर आहे.
Last Updated : Nov 13, 2019, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.