राजगुरुनगर (पुणे) - मागील महिन्यापासून भिमाशंकर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे भिमा व आवळा या दोनही नद्या दुथडी भरुन वाहत असून चासकमान धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. आज सकाळी चासकमान धरण ओव्हरफ्लो झाले आहे. खेड व शिरुर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण वरदान आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
- एकूण पाणी पातळी - 649.39 मीटर
एकूण पाणीसाठा - 239.58 दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीसाठा - 212.39 दशलक्ष घनमीटर
टक्केवारी - 99.02 टक्के
आजचा पाऊस - 4 मि.मी.
आजपर्यंत धरणक्षेत्रातील पाऊस - 438 मि. मी.
हेही वाचा - 'पेपर हाताळल्याने संसर्ग पसरण्याची भीती; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घ्याव्या'
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले की ब्रेकिंग न्यूज'