ETV Bharat / state

पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला धरण १०० टक्के भरलं; ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - पुणे

खडकवासला धरण १२ टीएमसी भरले आहे. त्यामुळे नद्या आणि कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. मुठा आणि मुळा नद्यांमध्ये पाणी सोडल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ४९ ठिकाणे बाधित होण्याची शक्यता आहे.

खडवासला धरण १०० टक्के भरलं
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:42 PM IST

पुणे - शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग नदी आणि कालव्यात सोडण्यात येत आहे. आज सकाळी जवळास ३ हजार क्युसेक पाणी सोडले.

खडवासला धरण १०० टक्के भरलं

शहराच्या आजूबाजूला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर असे चार साखळी धरणे आहेत. या चारही धरणाची एकूण क्षमता जवळपास ३० टीएमसी आहे. सध्या खडकवासला धरण १२ टीएमसी भरले आहे. त्यामुळे नद्या आणि कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. मुठा आणि मुळा नद्यांमध्ये पाणी सोडल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ४९ ठिकाणे बाधित होण्याची शक्यता आहे. अशी ठिकाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निश्चित केली आहेत. या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

Intro:mh pun 01 dam situation pune av 7201348Body:mh pun 01 dam situation pune av 7201348

Anchor
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात गेल्या आठवडाभर पडत असलेल्या पावसाने धरणे जवळपास १२ टीएमसी भरली आहेत.या धरणक्षेत्रात येणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग नदी व कालव्यात सोडण्यात येत आहे. गुरुवार सकाळपासून साडे तीन हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या खडकवासला साखळी धरण क्षेत्रात येणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव,टेमघर या चार धरणाची क्षमता जवळपास ३० टीएमसी आहे. सध्या १२ टीएमसी धरण भरले आहे.धरणातून पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठया संख्येने गर्दी करतात.धरणे भरल्यानंतर मुठा आणि मुळा या नद्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ४९ ठिकाणे बाधित होण्याची शक्यता आहे.संबंधित ठिकाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निश्चित केली आहेत.संबंधित ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.धरणक्षेत्राच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने पुण्याचे पाणी संकट टळले आहे.तर शेतकऱ्यांसाठीही आनंदाची ही बातमी आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.