ETV Bharat / state

महापुराचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करणार; पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका

author img

By

Published : Aug 21, 2019, 4:13 PM IST

राज्यावर दुःखाचे सावट असले तरी परंपरा जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. मात्र, तो साजरा करताना परिस्थितीचे भान ठेवले जाईल, अशी भूमिका पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वाडेश्वर कट्टा याठिकाणी पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केली.

महापुराचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करणार; पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका

पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सव संयमाने साजरा केला जाईल, अशी भावना पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे. तसेच पूरग्रस्तांना आर्थिक मदत, गाव दत्तक यांसारखे उपक्रमही काही गणेश मंडळ राबवत आहेत.

राज्यावर दुःखाचे सावट असले तरी परंपरा जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. मात्र, तो साजरा करताना परिस्थितीचे भान ठेवले जाईल, अशी भूमिका पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वाडेश्वर कट्टा याठिकाणी पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केली. पुण्यातील गणेशोत्सव हा आकर्षक देखावे आणि विसर्जन मिरवणुकांसाठी प्रसिद्ध आहे. प्रमुख मंडळांकडून यावर्षीदेखील उत्साहाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महापुराचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करणार; पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका

पुण्यातील वाडेश्वर कट्टा याठिकाणी दर बुधवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करून त्यांची भूमिका समजावून घेतली जाते. यावेळी पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी, गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या रहदारीच्या समस्या, मंडळांची शिस्त, व्यवस्थापन यांसारख्या विषयांवरदेखील चर्चा करण्यात आली.

Intro:महापुराचे भान गणेशोत्सवात जपले जाईल, पुण्यातील गणेश मंडळांची भूमिकाBody:mh_pun_03_ganpati_mandal_pune_pkg_7201348

anchor
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हटल्यानंतर पुणे शहर आणि येथील गणेशोत्सव डोळ्यासमोर येतो मात्र यंदा कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर दुःखाचे सावट आहे सांगली आणि कोल्हापूर परिसराला महापुराने झोडपून काढले ही बाब लक्षात घेऊन यंदा पुण्यातील गणेश उत्सव संयमाने साजरा केला जाईल अशी भावना पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे चांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत करण्याची ची भूमिका ही मंडळांनी घेतली आहे अनेक मंडळांनी भरघोस आर्थिक मदत गाव दत्तक घेणे या माध्यमातून आपले सामाजिक भान जपले असल्याची माहिती गणेश मंडळांनी दिली आहे दुःखाचे सावट असले तरी आपली परंपरा जपली जावी विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव परंपरेनुसार साजरा केला जावा या हेतूने गणेश उत्सव साजरा केला जाईल मात्र सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवले जाईल असे गणेश मंडळांकडून सांगण्यात आले आहे पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करत पुण्यातील वाडेश्वर कट्टा याठिकाणी गणेश मंडळांची भूमिका समजून घेण्यात आली त्यावेळी गणेश मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळाची भूमिका मांडली पुण्यातील गणेशोत्सव हा आकर्षक देखावे विसर्जन मिरवणुका यासाठी प्रसिद्ध आहे प्रमुख मंडळांकडून यावर्षीदेखील उत्साहात तयारी करण्यात आली आहे मात्र महापूराची घटना घडली असली तरी उत्सव साजरा करत असताना पूरग्रस्तांच्या मदतीचे भानही गणेश मंडळांनी ठेवल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितले पुण्यातील वाडेश्वर कट्टा याठिकाणी दर बुधवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करून त्यांची भूमिका समजावून घेतली जात असते यावेळी पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं पुण्यातील गणेशोत्सव म्हटल्यावर रहदारीचा प्रश्न प्रशासनाची आडकाठी अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असते मात्र प्रमुख मंडळांकडून संयमाची भूमिका घेतली जाईल असे देखील यावे सांगण्यात आले
Byte अंकुश काकडे, संयोजक वाडेश्वर कट्टा
Byte बाळासाहेब मारणे, बाबू गेनू मंडळ
Byte सूर्यवंशी, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.