पिंपरी-चिंचवड - पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालय हे सर्व सामान्यांसाठी खुले असून इथे सर्व प्रकारचे उपचार केले जात आहेत. दरम्यान, च्या काळात पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात ओपीडी बंद करण्यात आली होती. परंतु, औंध जिल्हा रुग्णालयात मात्र कोरोना काळात देखील अविरतपणे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना महामारी आटोक्यात येत असून अनेक रुग्णालये पूर्वपदावर येत असून तेथील ओपीडी सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे औंध जिल्ह्या रुग्णालयात कोरोनाच्या काळात देखील ओपीडी सुरू होती. गर्भवती महिलांला दिले जाणारे डोस, अपघातातील जखमी, इतर आजार या सर्वांवर रुग्णालयात उपचार केले जात होते. तसेच, कोरोना बाधित रुग्णांवर देखील उपचार केले जातात, ते सध्या ही सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या बाधित रुग्ण संख्या कमी झाली असून सध्या 21 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.