पुणे - आपण जर आजूबाजूच्या जगात डोकावले तर जाणवते की सर्वसामान्यपणे माणूस एका विशिष्ट चाकोरीतच जगत असतो. जरा हटके दैदिप्यमान कामगिरी करून जीवन जगणारे काही वेगळे असतात. अशाच पुण्याच्या दीपक बुंदेले यांनी विविध क्षेत्रात तर विशिष्ट अशी कामगिरी केली आहे. पण त्याच बरोबर त्यांनी तब्बल 1400 हुन राजकारणी, समाजकारणी, अभिनेते, खेळाडू, गायक-संगीतकार यांच्या बरोबर छायाचित्र काढून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद केली आहे.
साधारणपणे दिपक बुंदेले यांना वीस वर्षापूर्वी विविध वर्तमानपत्रात पत्रक लेखनाला सुरुवात केली. पुण्यातील विविध नागरी प्रश्नांवर आधारित अशी त्यांचे पत्र असायची यातूनच त्यांनी वृत्तपत्रात स्तंभलेखनाला सुरवात केली. ह्यातूनच त्यांना युवा भारत पुरस्कार, पत्र-मित्र पुरस्कार, गौरव पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले. एका कार्यक्रमात त्यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दिपक बुंदेले यांना पूरस्कार मिळाल्याची चर्चा नव्हे तर त्यांच्या फोटो ची चर्चा होत होती.आणि त्यानंतरच न कळत बुंदेले यांना छायाचित्राची आवड निर्माण झाली.
अशी घेत होते भेट
विविध वर्तमानपत्रात दैनंदिन कार्यक्रम कोण - कोणते होणार आहे हे येत असत. दररोज घराजवळ असलेल्या ग्रंथालयात जाऊन विविध वृत्तपत्रे हाताळून शहरात कोण कोणते मान्यवरांचे कधी आणि किती वाजता कार्यक्रम होणार आहे. याची माहिती घेऊन त्याची नोंद करत त्या त्या कार्यक्रमांना हजेरी लावून त्या त्या मान्यवरांसोबत बुंदेले फोटो काढत असत. राजकारणातील, समाजकारणातील तसेच अभिनेते,अभिनेत्री,खेळाडू, गायक संगीतकार अशा सुमारे 1400 हून अधिक मान्यवरांन बरोबर त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सह्या आणि त्यांच्याबरोबर छायाचित्र दिपक बुंदेले यांनी काढले आहे.आत्ता पर्यंत 1400 हुन अधिक मान्यवरांना भेटले असले तरी बुंदेले यांच्याकडे एकूण 8500 हुन अधिक छायाचित्रांचा संग्रह आहे.
या मान्यवरांच्या बरोबर काढले छायाचित्र
दीपक बुंदेले यांनी आत्तापर्यंत देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, अण्णा हजारे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, कपिल देव, सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा हजारो जणांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्र काढले आहे. त्यांच्या या छायाचित्र संग्रहालयाच नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केले आहे.
छायाचित्र संग्रहणाचा जागतिक विक्रम
दीपक बुंदेले यांनी गोळा केलेल्या त्यांच्या छायाचित्र संग्रहालयाचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. दीपक बुंदेले यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या मान्यवरांबरोबर छायाचित्र काढले आहे. त्यातील 80 टक्के छायाचित्र हे पुण्यात तर 20 टक्के मुंबईत जाऊन काढले आहे. त्याच बरोबर दीपक बदलेल यांनी लिहिलेल्या काही निवडक लेखांचे पुस्तक दीप मंथन हेही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. अशा छंद प्रेमी लेखक वक्ता व सामान्यपणे जीवन जगत असताना असामान्य कामगिरी करणारा या व्यक्तीचे कौतुक करावे तितके कमीच..