ETV Bharat / state

'लग्न करीन तर तुझ्याशीच करीन', असा तगादा लावणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या - पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं प्रियकाराकरानं तिची खदानीत ढकलून हत्या केलीय. यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Pune Crime News
Pune Crime News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 12:02 PM IST

पुणे Pune Crime News : प्रियकर महिलेनं लग्नाचा तगादा लावल्यानं प्रियकराने खदानीत ढकलून तिचा खून केलाय. ही घटना 9 जानेवारी रोजी पुण्यातील म्हाळूंगे चाकण परिसरातील खराबवाडी येथील स्टोन क्रशरच्या खदानीत घडलीय. याप्रकरणी देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

लग्नाचा तगादा लावल्यानं खदानीत ढकलून खून : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे 2010 पासून प्रेमसंबंध होते. मृत महिलेचं 2018 मध्ये लग्न झालं. मात्र, पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी ती माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर तिचं देवेंद्रकुमार याच्यासोबत पुन्हा बोलणं होऊ लागलं. दरम्यान, देवेंद्रकुमारची त्याच्या भावाच्या मेहुणीसोबत लग्नाची बोलणी सुरू झाली. ही बाब महिलेला समजल्यावर तिनं ‘लग्न करीन, तर तुझ्यासोबतच करीन, तुझ्यासोबतच राहीन,’ असा तगादा देवेंद्रकुमारकडं लावला. याला कंटाळून तिचा खून करण्याचं ठरवून देवेंद्रकुमारनं तिला बोलावून घेतलं. दुचाकीवरुन तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेलं. तिथून जवळच असलेल्या स्टोन क्रशरमधील खदानीत तिला उंचावरून ढकललं. यातच तिचा मृत्यू झाला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात : 10 जानेवारी रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढल्याची माहिती म्हाळूंगे पोलिसांना मिळाली. एका तरुणीचा खदानीवरुन पडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी अकस्मीत मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. महिलेची ओळख पटवत ही आत्महत्या आहे की हत्या, अस संशय पोलिसांना येऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील काही कंपन्यांचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर त्याला ताब्यात घेतलं. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. सीईओ महिलेकडून बाळाचा खून ; मुलाच्या शवविच्छेदन अहवालातून उघड झाली 'ही' धक्कादायक माहिती
  2. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गँगवॉरनं पुन्हा काढलं डोकं वर; 'हे' आहेत कारणं
  3. क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीचा आढळला मृतदेह; डॉक्टर विरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.