ETV Bharat / state

Pune Crime news: कर्नाटक येथील तोतया मेजरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; युनिफॉर्मसह कागदपत्रेदेखील तयार केले बनावट

पुणे पोलिसांना कर्नाटक येथील एका तोतया मेजरला बेड्या ठोकल्या आहे. तर, दोन दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे येथील रामनगर परीसरात गोळीबार झाल्याची घडल्याची घटना ताजी आहे. असे असतानाच टवाळखोरांनी आज पहाटेच्या सुमारास याच रामनगर कॅनाॅल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकुण 7 वाहनांवर लोखंडी कोयत्याने गाड्यांच्या काचा फोडून वाहनांचे नुकसान केले आहे.

Pune Crime news
बनावट मेजरला अटक
author img

By

Published : Jun 19, 2023, 11:45 AM IST

Updated : Jun 19, 2023, 4:25 PM IST

माहिती देताना पोलिस उपायुक्त

पुणे : तोतया मेजरने पुण्यातील खडकी येथील एका दुकानदार रिटायर्ड सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफॉर्म व इतर साहित्य खरेदी करून त्यांची फसवणूक केली आहे. तसेच सैन्य दलाचे प्रमुख कार्यालयाचे परिसरात तो अधिकारी असल्याचे दाखवून, तसेच तो राहात नसलेल्या सदनकमांड पुणे या कार्यालयाच्या पत्त्याचा वापर केला. तोतया आधारकार्ड काढून तसेच पॅनकार्ड व ओळखपत्रावर भारतीय सैन्य दलाचे युनिफॉर्म परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आर्थिक फसवणूक : या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रशांत भाऊराव पाटील वय-३२ वर्ष सध्या रा. म्हेत्रे निवास दुर्गानगर, सोनवणेवस्ती चिखली पुणे व मुळ रा. मु.पो. कुपटगिरी ता. खानापुर जि.बेळगाव कर्नाटक याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी प्रशांत भाऊराव पाटीलने २०१९ पासून ते आजपर्यंत भारतीय सैन्य दलामध्ये असल्याचे भासवले. त्याने खडकी पुणे येथील दुकानदार रिटायर्ड सुभेदार मेजर सुरेश मोरे यांच्याकडून सैन्य दलाचे सुभेदार पदाचे दोन युनिफॉर्म व इतर साहित्य खरेदी करुन पैसे नंतर देतो, असे सांगून अदयापपर्यन्त पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

तोतया आधारकार्ड : त्याने सदनकमांडमध्ये कार्यरत असल्याचे भासवले. सैन्य दलाचा युनिफॉर्म परिधान करुन व सैन्य दलाचा युनिफॉर्म असलेले फोटो तोतया आयडी वापरुन सदनकमांड हेडक्वॉटर क्वीन्स गार्डन पुणे या सैन्य दलाचे प्रमुख कार्यालयाचे परिसरात तो अधिकारी असल्याचे दाखवले. तसेच तो राहात नसलेल्या सदनकमांड पुणे या कार्यालयाच्या पत्त्याचा वापर करुन बनावट आधारकार्ड काढले. तसेच पॅनकार्ड व ओळखपत्रावर भारतीय सैन्य दलाचे युनिफॉर्म परिधान केलेल्या फोटोचा वापर करून फसवणूक केली असल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

गाड्यांच्या काचा फोडल्या : दुसरीकडे पुणे शहरात कोयता गँगचे अस्तित्व अजूनही दिसत आहे. वारजे कॅनाॅल रस्त्यावर 5 गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेनंतर वारजे माळवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पहाटेच्या 4 वाजक्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या अ‍ॅक्टीव्हावरून गेलेल्या अज्ञात 3 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा, अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. या नुकसानीत दोन ऑटो रिक्षा, एक महिंद्रा झायलो, एक इको कार, तसेच एका सफारी कार व दोन दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरीक संतप्त झाले आहेत. पोलीसांकडून आत्ता या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News: पब्जीच्या मैत्रीमुळे प्रियकर तुरुंगात; बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून मुलींना प्रेमात अडकवायचा, नकार दिल्यावर करायचा बदनामी
  2. Fake Facebook Account : महापालिका आयुक्तांच्या नावे बनावट फेसबुक, व्हॉट्सॲप खाते
  3. Nanded Crime News: पेरणीच्या तोंडावर बोगस सोयाबीन बियाण्यासह 99 लाखांचा मुद्देमाल जप्त; बनावट कंपनी विरोधात गुन्हा नोंद

Last Updated : Jun 19, 2023, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.