पुणे Pune Crime : पिझ्झा डिलिव्हरी देण्यास उशीर झाल्यानं डिलिव्हरी बॉयला मारहाण करुन हवेत गोळीबार केल्याची घटना वाघोली परिसरातील वाघेश्वर मंदिराजवळ मंगळवारी रात्री उशीरा घडली. चेतन पडवळ असं पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करुन हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर रोहित राजकुमार हुलसुरे असं पीडिताचं नाव आहे.
पिझ्झा देण्यास उशीर झाल्यानं मारहाण : पुण्याजवळील वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ चेतन वसंत पडवळ हा राहतो. त्यानं मंगळवारी उशीरा पिझ्झा ऑर्डर केला होता. यावेळी रोहित राजकुमार हुलसुरे हा पिझ्झा बॉय ही ऑर्डर घेऊन गेला होता. मात्र काही तांत्रिक कारणानं पिझ्झा देण्यास उशीर झाला. त्यामुळे डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याला आरोपी चेतन पडवळनं मारहाण केली. ग्राहकानं मारहाण केल्यानं डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे हा प्रचंड हादरला. त्यानं याबाबतची माहिती तत्काळ पिझ्झा सेंटरला दिली.
मारहाण करुन आरोपीचा हवेत गोळीबार : डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याला मारहाण केल्यानंतर त्यानं याबाबतची माहिती पिझ्झा केंद्रातील सहकाऱ्यांना दिली. त्यामुळे पिझ्झा सेंटरमधील देवेंद्र राहुल याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांनी चेतन वसंत पडवळ याला घटनास्थळी जाऊन जाब विचारला. यावेळी चेतन पडवळ यानं रोहितच्या सहकाऱ्यांनाही मारहाण केली. यावेळी चेतन पडवळ यानं त्याच्या कारमधून पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. त्यामुळे पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली.
चेतन पडवळ विरोधात गुन्हा : पिझ्झा डिलिव्हरी उशीरा दिल्यामुळे चेतन पडवळ यानं डिलिव्हरी बॉय रोहितला मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारल्यामुळे रोहितच्या सहकाऱ्यांनी चेतन पडवळनं माराहाण केली. इतकच नाही, तर त्यानं कारमधून पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्यात पीडित रोहितनं तक्रार दाखल केली. रोहितच्या तक्रारीवरुन आरोप चेतन पडवळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :