ETV Bharat / state

Pune Crime : जमिनीचा वाद; भाजपा माजी नगरसेविका पतीची बिल्डरला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद - नगरसेविका पतीची बिल्डरला मारहाण

Pune Crime : जमिनीच्या वादातून भाजपा माजी नगरसेविकेच्या पतीनं बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यालयातील पार्किंगमध्ये ही मारहाण करण्यात आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Pune Crime
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 11:44 AM IST

Updated : Oct 19, 2023, 1:47 PM IST

घटनेचा सीसीटीव्ही ( ईटीव्ही भारत या व्हिडिओची पुष्टी करत नाही )

पुणे Pune Crime: पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीनं बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मारहाणीचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सध्या शहरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. जमिनीच्या वादावरुन ही मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Pune Crime
माजी नगरसेविकेचे पती नितीन बोऱ्हाडे

बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल आणि माझ्या काकांमध्ये जागेवरुन वाद सुरू आहे. तो सोडवण्यासाठी मी मध्ये गेलो होतो. नरेश पटेल यांच्याकडून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची भाषा अरेरावीची होती. बुधवारी सुनावणी दरम्यान तुम्ही कोर्टात जा किंवा कुठेही जा, मला फरक पडत नाही, असं नरेश पटेल आमच्या काकांना म्हणाले, मात्र हे अशोभनीय आहे. यावरुनच रागाच्या भरात झटापट झाली. - नितीन बोऱ्हाडे

Pune Crime
माजी नगरसेविकेचे पती नितीन बोऱ्हाडे

जमिनीच्या वादातून घडली घटना : पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती बुधवारी महापालिका भावनात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या पार्किंगमध्ये त्यांची भेट या घटनेतील बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांच्यासोबत झाली. गेल्या काही दिवसांपासून बोराडे कुटुंब आणि नरेश पटेल यांच्यात जमिनीवरुन वाद सुरू आहे.

Pune Crime
माजी नगरसेविकेचे पती नितीन बोऱ्हाडे

बांधकाम व्यावसायिकाच्या लगावली कानशिलात : शहरातील बोऱ्हाडेवाडीतील जागेतून जाणाऱ्या डीपी मार्गावरुन भाजपाच्या माजी नगरसेविकेचे पती नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांच्यात वाद सुरू आहे. या वादातून पिंपरी महापालिकेतच बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर बोऱ्हाडे यांनी नरेश पटेल यांच्या कानशिलात लगावली. ही घटना बुधवारी पिंपरी महापालिकेच्या पार्किंगमध्ये घडली आहे.

महापालिकेत होती सुनावणी : नितीन बोऱ्हाडे यांचे काका आणि नरेश पटेल यांची बोऱ्हाडेवाडीतील सर्व्हे नंबर 644 मध्ये शेजारी-शेजारी जागा आहे. या जागेतून जाणाऱ्या डीपी मार्गावरुन भाजपाच्या माजी नगरसेविकेचे पती नितीन बोऱ्हाडे आणि नरेश पटेल यांच्यात वाद सुरु आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत सुनावणी होती. सुनावणीनंतर नितीन बोऱ्हाडे आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली. बोऱ्हाडे यांनी नरेश पटेल यांच्या कानशिलात मारली. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तत्काळ मध्यस्थी करत बोऱ्हाडे यांना रोखलं.

काकांना अरेरावीनं बोलल्यानं झाली झटापट : नितीन बोऱ्हाडे यांनी सांगितलं की, बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल आणि त्यांच्या काकामध्ये जागेवरुन वाद सुरू आहे. तो सोडवण्यासाठी मी मध्ये गेलो होतो. नरेश पटेल यांच्याकडून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची भाषा अरेरावीची होती. बुधवारी सुनावणी दरम्यान तुम्ही कोर्टात जा किंवा कुठेही जा, मला फरक पडत नाही, असं नरेश पटेल आमच्या काकांना म्हणाले, मात्र हे अशोभनीय आहे. यावरुनच रागाच्या भरात झटापट झाली, असं नितीन बोऱ्हाडे यांनी सांगितलं.

अद्याप कुठलीही तक्रार दखल नाही : महापालिकेत राडा घालणारे नितीन बोऱ्हाडे हे भाजपा माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती आहेत तर भाजपा आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र राजकीय नेत्यांनी कायदा हातात घेतला जात असल्यामुळे अशा व्यक्तींवर कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित झालाय. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र अद्यापही त्यांच्याकडून नितीन बोऱ्हाडे यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दखल करण्यात आलेली नाही.

Disclaimed- ईटीव्ही भारत

हेही वाचा :

  1. Pune Crime News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांचा तपास सुरू
  2. Pune Crime : आईच ठरली वैरीण; चिमुकल्या मुलीचा गळा दाबून आईनं केला खून

Last Updated : Oct 19, 2023, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.