पुणे - जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच याची खबरदारी घेतली असून सर्व मतदान यंत्रे पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित आहेत. कोणत्याही मतदान केंद्रात पाण्याची गळती होणार नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकानी मतदान करून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे.
गेल्या २ दिवसांपासुन जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने पुढील 48 तास देखील पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र, मतदारांनी न घाबरता मतदान करून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि मतदान जरुर करावे. 'आंधी हो या तुफान, हम जरूर करेंगे मतदान' असे म्हणत जिल्ह्याधिकाऱ्यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. पुणे जिल्ह्यातील मतदार सुजाण असून ते हवामानाची चिंता न करता आपला मतदानाचा हक्क बजावतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - राजगुरुनगरमध्ये मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसेस अडकल्या चिखलात
हेही वाचा - निर्णय न घेणाऱ्यांच्या घरात 'इंदापूरमधला गडी', पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला