पुणे - लग्नाची लगबग असतानाही रखरखत्या उन्हात पुण्यातील श्रद्धा भगत या नववधूने विवाह सोहळ्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. आप्पा बळवंत चौकातील नुतन मराठी विद्यालयातील केंद्रामध्ये तिने मतदान केले.
सोमवार (२३ एप्रिल) पुणे लोकसभेसाठी मतदान पार पडले. त्यातच लग्नाचा मुहूर्त असल्याने जिल्ह्यात लग्नाचीही धामधूम सुरू आहे. असे असतानाही बोहल्यावर चढणापूर्वी श्रद्धा सारख्या अनेक वधू-वरांनी मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.