ETV Bharat / state

Gold Smuggling Case: सोने तस्करीकरिता वाट्टेल ते... महिलेने चक्क गुप्तांगात लपवून आणलेले तब्बल २० लाख रुपयांचे सोने - 20 लाख रुपयांचे सोने

सोमवारी रात्री पुण्यातील लोहगाव विमानतळावर सोने तस्करीचा एक आगळा वेगळा पर्दाफाश कस्टम विभागाने केला आहे. एका महिलेने चक्क गुप्तांगात लपवून आणलेले तब्बल 20 लाख रुपयांचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime News
सोने तस्करी
author img

By

Published : Jul 4, 2023, 9:01 AM IST

पुणे : आजपर्यंत आपण चोरीचे अनेक प्रकार आपण पाहिले आहे. वेगवेगळ्या फिल्मी पद्धतीने चोरी करणाऱ्या चोरांना देखील आपण पाहिले आहे. पण सोमवारी रात्री सोने तस्करीचा एक विचित्र प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने हे सोने भुकटी स्वरूपात कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविले होते. या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने गुप्तांगात सोने लपवून आणल्याने अधिकारी देखील चक्रावले होते.

सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल : याबाबत अधिक माहिती अशी की, एक महिला दुबईवरून सोने घेऊन येणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विमानतळावर चेकिंग वाढवली होती. जेव्हा दुबईचे विमान पुण्यात आले, तेव्हा एक महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर जाताना सुरक्षा रक्षकांना दिसली. यामुळे त्यांचा संशय वाढला आणि त्या महिलेला थांबवून तिची चौकशी सुरू केली. तेव्हा महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचा प्रकार उघडकीस आला. या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली. महिलेकडून 20 लाख 30 हजार रुपयांचे 423 ग्रॅम 41 मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.

सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई : 2022 मध्ये मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने एकूण 604 किलो सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्या सोन्याची किंमत 360 कोटी रुपये इतकी होती. मागील सहा महिन्यात मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने तब्बल 144 किलो सोने जप्त केले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या एका तस्करीच्या कारवाईत सोन्याची बारीक भुकटी करून ती शरीरात लपवून आणल्याचेही दिसून आले आहे.

हेही वाचा :

  1. Gold Smuggling Cases : देशात सोन्याच्या तस्करीत 33 टक्क्यांची वाढ; मुंबई विमानतळावर एकूण १४४ किलो सोने जप्त
  2. Gold Smuggling Case Mumbai: सोन्याची पेस्ट करून तस्करी करण्याचा नवा फंडा, मुंबई विमानतळावर गेल्या वर्षभरात ६०० किलो सोने जप्त
  3. Smuggling Gold: दुबईमार्गे सोने तस्करी करणाऱ्या तिघांना अटक; नागपूर पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.