ETV Bharat / state

PSI Somanth Zende News: कोट्यधीश झालेल्या पीएसआयवर कारवाईची टांगती तलवार, ऑनड्युटी गेम खेळल्यामुळं कारवाईची मागणी

PSI Somanth Zende News ऑनलाईन गेमिंग खेळून दीड कोटी जिंकलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. ऑनड्युटी ऑनलाईन जुगार खेळल्यानं तसंच जुगाराला प्रोत्साहन दिल्यानं कारवाई करण्याची मागणी भाजपानं केली आहे.

PSI Somanth Zende News
PSI Somanth Zende News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 10:03 AM IST

Updated : Oct 12, 2023, 12:12 PM IST

पुणे (पिंपरी चिंचवड) PSI Somanth Zende News : पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे सध्या चांगलेच चर्चेत आलेत. नुकतेच त्यांना ऑनलाइन गेम खेळून दीड कोटींचं बक्षीस लागलं. मात्र, सध्या त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. कारण ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे नेते अमोल थोरात यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पीएसआय सोमनाथ झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयातील आरसीपीमध्ये आहेत. मंगळवारी बांग्लादेश विरूद्ध इंग्लंडच्या क्रिकेट मॅचवर ऑनलाईन गेमिंगमध्ये त्यांच्या टीमला दीड कोटींचं बक्षीस लागलं. मात्र, सर्वत्र प्रसिद्धी मिळल्यानंतर पीएसआय सोमनाथ झेंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यापूर्वी सोमनाथ झेंडे चाकण येथे ड्युटीवर असताना डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी झेंडे यांनी एकाकडे ८५ हजार रुपयांची मागणी केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी लाचलुचपत विभागानं झेंडे यांच्यासाठी पैसे घेताना एका व्यक्तीला रंगेहात पकडलं. याची दखल घेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी झेंडे यांना तडकफडकी निलंबित केलं होतं. त्यानंतर त्यांची नियुक्ती साईड ब्रँच आरसीपी (दंगा काबू पथक) येथे करण्यात आली.

राज्याच्या पोलीस दलाबाबत चुकीचा संदेश - ऑनड्युटी ऑनलाइन गेम खेळून कोट्यवधी रुपये मिळाल्यानं पुन्हा त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भाजपाचे नेते अमोल थोरात यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं की, ऑनलाइन जुगार किंवा ऑनलाइन गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. असं असताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत नियुक्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार खेळल्यानं कारवाई करण्यात यावी. मोठी कामगिरी केली असल्याच्या आविर्भावात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी सोशल मीडियावर स्वत:चे खाकी गणवेशातील फोटो व व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलीस दलाबाबत चुकीचा संदेश गेला आहे. अशा परिस्थितीत सोमनाथ झेंडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी केली.

कायदेशीर बाबी तपासून कारवाई - ऑनलाइन जुगारामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कायद्याचे संरक्षक म्हणविणाऱ्या पोलिसानंच ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणे ही पोलीस दलासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ऑनड्यूटी असताना कामात कसूर करून, मोबाइल ॲप्सवर ऑनलाइन जुगार खेळला. त्यामुळे त्यांना काही रक्कम मिळाली. सोमनाथ झेंडे यांच्यावर प्रशासकीय तसंच कायदेशीर बाबी तपासून कारवाई करण्यात येईल. ही चौकशी पोलीस उपायुक्त गोरे यांच्याकडं देण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोमनाथ झेंडे यांच्यावर काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे.

  • Disclaimer - ईटीव्ही भारत कोणत्याही गेमिंग ॲपला समर्थन किंवा प्रोत्साहन देत नाही. अशा ऑनलाईन गेममध्ये वित्तीय जोखीम असते. तसेच या गॅमचे व्यसन लागू शकते.

हेही वाचा-

  1. PSI Somnath Zende News : पीएसआयनं गेमिंग ॲपमधून जिंकलं 11 चं तब्बल 1.5 कोटी रूपयांचं बक्षिस, तीन महिने सुरू होते प्रयत्न

Last Updated : Oct 12, 2023, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.