ETV Bharat / state

पाटसमध्ये व्यापाऱ्यांचे शासना विरोधात 'मानवी साखळी आंदोलन' - Lockdown news

शासनाने निर्बंध लावताना व्यापारी वर्गाचा विचार करायला हवा होता. व्यापारी अडचणीत आहेत. शासनाने निर्बंध लावताना योग्य असा तोडगा काढून व्यापाऱ्यांना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करावी. अशी मागणीही यावेळी आंदोलक व्यापाऱ्यांनी केली आहे.

पाटस
पाटस
author img

By

Published : Apr 9, 2021, 7:19 PM IST

दौंड (पुणे) - तालुक्यातील पाटस येथे आज(शुक्रवार) व्यापाऱ्यांनी शासनाच्या लॉकडाऊनच्या निर्णया विरोधात निषेध नोंदवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. पाटस मधील व्यापारी वर्गाने मानवी साखळी करून सरकारचा निषेध करणारे बॅनर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

मानवी साखळी आंदोलन
शासन निर्णयाचा निषेध पाटस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्यापारी आणि दुकानदारांनी हातात बॅनर घेऊन आंदोलन केले. 'मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरुरी',अशा आशयाचे बॅनर घेत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी आणि दुकानदारांनी मानवी साखळी केली होती. शासनाने निर्बंध लावताना व्यापारी वर्गाचा विचार करायला हवा होता. व्यापारी अडचणीत आहेत. शासनाने निर्बंध लावताना योग्य असा तोडगा काढून व्यापाऱ्यांना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करावी. अशी मागणीही यावेळी आंदोलक व्यापाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कडक लॉकडाऊन बाबत चर्चा होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.